• A
  • A
  • A
नसबंदीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी तेलंगाणात धाव ; रुग्णांची होतेय हेळसांड

गडचिरोली - नसबंदीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सुंदरनगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी तेलंगणा राज्यात धाव घेत आहेत. मात्र, तेथील महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून दिले जात आहे. त्यांना साधे एकवेळचे जेवणही दिले जात नाही. यामुळे जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.


हेही वाचा - "अण्णा हजारेंची प्रकृती खालावली; यकृतावर परिणाम, ग्रामस्थांचा...
कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे शस्त्रक्रिया राबविण्यात येत आहे. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या वर्षात नसबंदी शस्त्रक्रियेसाठी ऑक्टोबर महिन्यात ४१, नोव्हेंबर मध्ये १८ , डिसेंबरमध्ये ३४ आणि आता जानेवारी महिन्यात १६ महिला लाभार्थी येथे दाखल झाले. मात्र, या लाभार्थ्यांची जेवणाची सोय करण्यात आली नाही. महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या नवनियुक्त मंचेरियल आणि असिफाबाद या दोन्ही जिल्ह्यातून ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे नसबंदी शस्त्रक्रियेसाठी महिला लाभार्थी दाखल होतात. त्यांच्याबरोबर घरची मंडळी आणि त्यांची लहान मुले असतात. मात्र, लाभार्थी महिलेसोबत एकाला मोफत जेवण देण्याचे नियम असताना सुद्धा त्यांना जेवण दिले जात नाही, असा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.

ग्रामीण रुग्णालयातील आहार दर्शक तक्तानुसार सकाळी ७ वाजता नाश्ता आणि चहा, सकाळी ११ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता जेवण देणे गरजेचे आहे. तसेच जेवणात भात, पोळी, वरण आणि भाजी द्यायला पाहिजे. मात्र, नसबंदी शस्त्रक्रियेसाठी आणि उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना नाश्ता आणि चहा दिला जात नाही, असे रुग्ण सांगतात. प्राथमिक आरोग्य विभागात काम करणाऱ्या आरोग्य सेवक आणि सेविका अशा कर्मचाऱ्यांना वर्षाचे ७० लाभार्थीचे लक्षांक पूर्ण करणे अनिवार्य असते. यामुळे हे कर्मचारी शेजारील तेलगांना राज्यातून लाभार्थी शोधून आणतात. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्याकडे ते दुर्लक्ष करत आहेत.

हेही वाचा - "पनवेलमधील आरोग्य केंद्राला मुहूर्त मिळेना, नागरिकांची गैरसोय"
सुंदरनगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या तेलंगाणा राज्यातील कोमरम भीम (आसिफाबाद) जिल्ह्यातील अंकिता संतोष येरकाटूर, सुनीता राजाराम जलमपल्ली, चिटयम्मा प्रकाश कनलम, सत्यक्का भीमेश बेब्बरी, कविता अशोक लग्गम, रजिता स्त्यन्ना तुंगेडा, निर्मला नारायण वाढई (सर्व रा. तेलंगाणा ) या ७ लाभार्थ्यांना नसबंदी शस्त्रक्रियेसाठी ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे दाखल केले. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयात प्रतीक्षालय नाही. यामुळे रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईक आणि लहान बाळांना पार्किंगच्या ठिकाणी पाळणा बांधून त्यांची व्यवस्था करावी लागत आहे.

प्रतीक्षालय नसल्याने लहान बाळांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कनिष्ठ लिपिक जी. डी. पोटफोडे यांची विचारणा केली असता, जेवणाबाबत तक्रार मिळाली आहे. यापूर्वी सुद्धा दोनदा तक्रार प्राप्त झाली होती. मात्र, वैद्यकीय अधीक्षक तथा सहाय्यक अधीक्षक उपस्थित नाहीत. ते आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES