• A
  • A
  • A
बनावट कॉल सेंटर चालविणाऱ्या दोघांना अटक

मुंबई - बनावट कॉल सेंटर चालवून नोकरीचे आमिष दाखवत लाखोंचा गंडा घालणाऱ्या दोघांच्या पायधुनी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या प्रकरणी पीडित तक्रारदार शमरोज नदीम पठाण (२९) यांच्या तक्रारीवरुन दोघांना अटक करण्यात आली आहे.


मुंबईत पायधुनी परिसरात राहणारे शमरोज नदीम पठाण यांनी २ वर्षे सौदी अरेबियाच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी केल्यानंतर मुंबईत नोकरी शोधण्यास सुरुवात केली होती. हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शमरोज यांनी त्यांचा बायोडाटा MONSTER INDIA.COM या संकेतस्थळावर अपडेट केला होता. या दरम्यान नोव्हेंबर २०१८ मध्ये शमरोज यांना J W MARRIOT या हॉटेलमध्ये मॅनेजर पदाच्या नोकरीसाठी मुलाखत घेतली जाईल, अशा माहितीचा फोन आला.
हेही वाचा - माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास मोदीच जबाबदार - अण्णा हजारे
हा फोन अनुपमा नावाच्या महिलेने केला होता. यानंतर एका आठवड्यातच शमरोज यांना आलम नावाच्या व्यक्तीने त्यांची निवड झाली असून नियुक्तीपत्र ईमेल केल्याचे सांगितले. शमरोज यांच्या ईमेलवर नियुक्तीपत्र आल्यानंतर परदेशातील या नोकरीसाठी प्रोसेसिंग फी, विसा, फॉर्म फी, तिकीट यांची कारणे देत तब्बल २,८५,३०० रुपये मागण्यात आले. काही दिवसानंतर शमरोज यांना पुन्हा जीएसटीचे शुल्क भरावे लागेल, म्हणून ७१ हजार रुपयांची मागणी करणारा अनुपमा यांचा फोन आला. यावर शमरोज यांना शंका आल्याने त्यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा - नक्षलवाद्यांकडून २ आदिवासींची हत्या, ११ दिवसात ७ जणांच्या हत्या
पोलिसांनी चौकशी केली असता हा फोन उत्तरप्रदेशमधून आल्याचे समजले. पुढे तपास करुन उत्तरप्रदेशच्या मेट्रो स्थानक क्रमांक १६ येथे सापळा रचून २ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १५ मोबाईल फोन, २ लॅपटॉप, ६ वेगवेगळ्या बँकांचे एटीएम कार्ड, पेनड्राईव आणि रोख १ लाख रुपये जप्त करण्यात आले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES