• A
  • A
  • A
लोकबिरादरी प्रकल्पास आयएएस अधिकाऱ्यांची भेट; भामरागडच्या आयटीआय इमारतीचे लोकार्पण

गडचिरोली - जिल्ह्याचे पालकमंत्री अमरीश आत्राम व जिल्हाधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्यासोबत जनजाती कार्य मंत्रालय भारत सरकारचे सचिव दिपक खांडेकर तसेच राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा वर्मा आयएएस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी गडचिरोली येथील लोकबिरादरी प्रकल्पास भेट दिली. यावेळी त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्याशी चर्चा केली. या दौऱ्यात भामरागड येथील नवनिर्मित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.


हेही वाचा - गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून २ आदिवासींची हत्या, ११ दिवसात ७ जणांच्या हत्या
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशस्त प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री तथा आदीवासी विकास व वने राज्यमंत्री अंबरीश आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी भामरागडच्या नगराध्यक्षा संगीता गाडगे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण नागपूरचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे, सभापती सुखराम मडावी, तहसीलदार कैलास अंडील, उपविभागिय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, प्रकल्प अधिकारी नीरज मोरे आदी उपस्थित होते.
त्यानंतर लोकबिरादरी प्रकल्पात सकाळी १० वाजता मान्यवरांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यानंतर त्यांनी डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमटे दांम्पत्यांशी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. यानंतर लोकबिरादरी दवाखान्याचे प्रमुख डॉ. दिगंत आमटे, प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे यांनी प्राणी अनाथालय, संगणक कक्ष, आश्रम शाळा, ग्रंथालय, गोटुल, बांबू हस्तकला, रुग्णालयाची माहिती दिली. यावेळी आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींनी पालकमंत्री व सर्व अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अधिकार्‍यांनी प्रकल्पाच्या काम पाहून समाधान व्यक्त केला.
हेही वाचा - राष्ट्रपती ६ फेब्रुवारीला गडचिरोलीत; वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचे करणार लोकार्पण

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES