• A
  • A
  • A
आश्रमशाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर अव्वल तर, नाशिक दुसऱ्या क्रमांकावर

गडचिरोली - आदिवासी विकास विभागाच्या वतीने गडचिरोली येथील जिल्हा स्टेडियमवर आश्रमशाळांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये नागपूर विभागाने विजेतेपद पटकावले आहे, तर नाशिक विभागाने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.


हेही वाचा -गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून २ आदिवासींची हत्या, ११ दिवसात ७ जणांच्या हत्या
२९ ते ३१ जानेवारी या कालावधीत जिल्हा प्रेक्षागार मैदानावर या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत नागपूर विभागाने सर्वाधिक ४२८ गुण मिळवून विजेतेपद पटकावले. तर, नाशिक विभाग ३७६ गुण घेऊन उपविजेता ठरला.
या क्रीडा संमेलनात नागपूर, नाशिक, अमरावती व ठाणे विभागातील १ हजार ७५७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील खेळाडूंनी कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, हँडबॉल या सांघिक खेळांसह लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे इत्यादी वैयक्तिक स्पर्धांमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले.
याप्रसंगी मागील वर्षी मिशन शौर्य-१ अंतर्गत माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात देवाडा आश्रमशाळेतील मनिषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडावी व जिवती शासकीय आश्रमशाळेतील कविदास काठमोडे आणि विकास सयाम यांचा समावेश होता. याशिवाय मिशन शौर्य-२ अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या चारही विभागातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा -राष्ट्रपती ६ फेब्रुवारीला गडचिरोलीत; वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचे करणार लोकार्पण
बक्षीस वितरण आणि समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्र शासनाच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर, राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, आमदार डॉ.देवराव होळी, नाशिकचे अप्पर आयुक्त गिरीश सरोदे, आदी अधिकारी, पोलीस आणि गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका डॉ. अनिता लोखंडे उपस्थित होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES