• A
  • A
  • A
नक्षलवाद्यांकडून २ आदिवासींची हत्या, ११ दिवसात ७ जण बळी

गडचिरोली - धानोरा तालुक्यातील मर्केगावामध्ये नक्षलवाद्यांनी २ आदिवासींची हत्या केली. मागील ११ दिवसात ७ जणांचा बळी गेला आहे.

संग्रहित छायाचित्र


हेही वाचा -'नक्षलवाद्यांनी हत्या केलेले पाच जण पोलिसांचे खबरी नव्हते'
यापूर्वी २२ जानेवारीला भामरागड तालुक्यातील कसनासूर येथील ३ नागरिकांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्यांचे मृतदेह भामरागड-आल्लापल्ली मार्गावर फेकून दिले होते. तर दुसऱ्याच दिवशी अनेक ठिकाणी नक्षली बॅनर आढळून आले. यामध्ये नक्षलवाद्यांनी भारत बंदचे आवाहन केले होते. त्यानंतर एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या ताळगुडा येथील सोनसाय तानु बेग याची हत्या केली होती. तर बुधवारी कोरची तालुक्यातील बेळगाव येथे भाजीपाल्याचा ट्रक पेटवून दिला. तर त्याच रात्री गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव जवळील मजगाव येथेही रस्ता कामावरही २ जेसीबी व ४ ट्रॅक्टर नक्षलवाद्यांनी पेटवून दिले होते. या सर्व घटना ताज्या असतानाच आज पुन्हा नक्षलवाद्यांनी दोघांची हत्या केली आहे.

हेही वाचा - गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून हत्याकांडासह जाळपोळ सुरूच; ७ वाहने पेटवली
२५ ते ३१ जानेवारीपर्यंत नक्षल्यांकडून शहीद सप्ताह पाळण्यात आला होता. या सप्ताहादरम्यान नक्षल्यांनी अनेक ठिकाणी नक्षली बॅनर बांधून भीती निर्माण केली होती. काही ठिकाणी झाडे तोडून मार्गही रोखला होता. दरम्यान, शुक्रवारी दुपारी रस्त्यावर तोडून टाकलेले झाडे हटवताना बॉम्बस्फोट झाल्याची ही घटना ग्यारापत्ती जंगला जवळच्या देवसूर गावालगत घडली. हा छोटा स्फोट असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेबाबत पोलिसांनी गुप्तता बाळगली आहे. आज पुन्हा दोघांची हत्येची घटना समोर आल्याने नक्षलवाद्यांच्या धुडगूस सुरुच आहे.

हेही वाचा - गडचिरोलीत नक्षल्यांकडून आणखी एका निरपराध आदिवासीची हत्या


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES