• A
  • A
  • A
राष्ट्रपती ६ फेब्रुवारीला गडचिरोलीत; वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचे करणार लोकार्पण

गडचिरोली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद ६ फेब्रुवारी रोजी गडचिरोली दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेज मध्यम सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. या दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले नसले तरी भाजप व प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.


चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवर ५९ हजार ७४४ लक्ष रूपये खर्च करुन चिचडोह बॅरेज मध्यम सिंचन प्रकल्पाचे बांधण्यात करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ४२ तर, चंद्रपूर जिल्ह्यातील २९ अशा ७१ गावातील १६ हजार ७८३ हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. या बॅरेजला ३८ गेट आहेत. १२ ऑक्टोबर २०१८ ला येथील सर्व गेट बसवून वैनगंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह रोखण्यात आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या बॅरेजमध्ये १५ मीटर पर्यंत पाणीसाठा आहे.
वाचा - कोरेगाव भीमा दंगल : प्रा. आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून अटक
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्या मार्फत सन २०१०-११ ला या बॅरेजचे काम सुरू करण्यात आले. हा बॅरेज पूर्ण होईपर्यंत ५९ हजार ७४४ लक्ष रूपयांचा खर्च झाला असून बॅरेजचे किरकोळ कामे वगळता इतर सर्व कामे पूर्ण झाली आहेत. या बॅरेजची लांबी ६८३ मीटर असून उंची १०.६० मीटर आहे. यात १५ बाय ९ मीटरचे ३८ गेट बसवण्यात आले आहेत. या प्रकल्पातून गडचिरोली तालुक्यातील स्वतंत्र क्षेत्रातील १६०० हेक्टर, तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेतून ४ हजार ३३० हेक्टर, चंद्रपूर जिल्ह्याच्या लोंढोली उपसा सिंचन योजनेतून २ हजार १३९ हेक्टर आणि वाघोली बुटी या उपसा सिंचन योजनेद्वारे ३ हजार ४४१ हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. यात आणखी काही ठिकाणी उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहेत.

वाचा - आंदोलनाचा आज चौथा दिवस; अण्णांचे वजन साडेतीन किलोने घटले
या बॅरजेमध्ये ६२.५३१ द.ल.घ.मी पाणीसाठा करता येणार असून यातील ६२.०१७ द.ल.घ.मी पाणीसाठा शेतीसाठी उपयोगात येणार आहे. तर, १५.६१३ दलघमी पाणी बिगर सिंचन पाणीवापर असून यातील ९.३८ दलघमी पाणी पिण्यासाठी तर ६.२५३ द.ल.घ.मी पाणी हे उद्योगासाठी वापरात येणार आहे. बॅरेजच्या प्रस्तावित १६ हजार ७८३ हेक्टर सिंचन क्षेत्रापैकी सद्यस्थितीत प्रत्यक्ष ११ हजार ५१० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. चामोर्शी, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील सावली या तालुक्यातील शेतकऱ्यांना या बॅरेजचे पाणी मिळणार आहे.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES