• A
  • A
  • A
पोलीस दलातर्फे आयोजित विवाह सोहळ्यात ५४ आदिवासी जोडपी होणार विवाहबद्ध

गडचिरोली - पोलीस अधीक्षक कार्यालय, मैत्री परिवर संस्था आणि साईभक्त सेवक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ३ फेब्रुवारीला आलापल्ली येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ५४ आदिवासी जोडपी विवाहबद्ध होणार असून यामध्ये ५ आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.


३ फेब्रुवारीला आलापल्लीच्या क्रीडा संकुलात सकाळी १० वाजता विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोली पोलीस दलाच्यावतीने आदिवासी जनतेसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्गम-अतिदुर्गम भागातील आदिवासींची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते मुला-मुलींचे विवाह मोठ्या थाटात करू शकत नाही. त्यामुळे त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी पोलीस विभाग आणि मैत्री परिवार संस्थेच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
हेही वाचा - 'नक्षलवाद्यांनी हत्या केलेले पाच जण पोलिसांचे खबरी नव्हते'
पोलीस विभागाच्यावतीने सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण विवाह समिती, कार्यालयीन समिती अशा समित्यांची स्थापना करण्यात आले आहे. आदिवासी समाजाच्या रीतीरिवाजानुसार वाजत-गाजत मिरवणूक काढून विवाह सोहळा पार पडणार आहे. विवाहबद्ध होत असलेल्या जोडप्यांना आदिवासी विकास विभागाच्यावतीने कन्यादान योजनेमार्फत आर्थिक लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मैत्री परिवार संस्थेचे प्रा. प्रमोद पेंडके आदी उपस्थित होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES