• A
  • A
  • A
मलेझरीत शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

गडचिरोली - आदिवासी विकास व वने राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अंबरीश आत्राम यांच्या हस्ते मूलचेरा तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. राजे छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम आणि क्रीडा प्रसारक मंडळ यांच्या सौजन्याने बुधवारी हे अनावरण पार पडले.


हेही वाचा - मुख्यमंत्री साहेब माझ्या लग्नाला या; भाजप कार्यकर्त्याचा आग्रह, फडणवीसांना कडधान्यांचा आहेर

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य व शिवाजी महाराजांवरील नाट्य प्रयोगाने उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले. यासोबतच यावेळी राजे अंबरीश आत्राम यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिवाजी महाराज हे आजच्या युवा पिढीचे खऱ्या अर्थाने आदर्श व मार्गदर्शक असायला हवे. त्यांचा आदर्श ठेवत समाजाचा उत्कर्ष साधण्यासाठी तरुणाईने कार्यमग्न राहणे आवश्यक आहे.


यासोबतच बाबासाहेबांपासून प्रेरणा घेऊन तरुणांनी उच्चशिक्षित होऊन सामाजिक प्रगतीसाठी हातभार लावणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनीही मुलांवर तशा पद्धतीचे संस्कार करायला पाहिजे. तरच आदर्श समाज व्यवस्था प्रस्थापित होणे शक्य आहे. आपल्याकडे पूर्वजांच्या आशीर्वादाने स्वराज्य आहे त्याचे सुराज्यात रूपांतरण करणे ही आज आपली जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी समाजकल्याण सभापती माधुरीताई उरेते, भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रकाश गेडाम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हेही वाचा - जळगावात वाळूमाफियांची दहशत; जिल्हाधिकारी कार्यालयातून वाळूचे ७ ट्रॅक्टर गायबCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES