• A
  • A
  • A
प्रा. वरवरा रावसह सुरेंद्र गडलिंग गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात, ११ दिवसांची कोठडी

गडचिरोली - देशात खळबळ उडविणाऱ्या कोरेगाव- भीमा प्रकरणात पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रा. वरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंग या दोघांना नक्षल्यांसोबत संबंध असल्याच्या आरोपावरून आज गुरुवारी गडचिरोली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर डिसेंबर २०१६ साली सुरजागड लोह खनिज पहाडावर झालेल्या नक्षल जाळपोळीत सहभागी असल्याचा आरोप ठेवला. दोघांनाही अहेरी न्यायालयात हजर केल्यावर त्यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.


कोरेगाव - भीमा हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांनी नक्षल थिंक टँक असल्याच्या संशयावरून काही बड्या नेत्यांना अटक केली होती. यातील आरोपी पुण्याच्या येरवडा कारागृहात आहेत. या प्रकरणातील आरोपी प्रा. वरवरा राव आणि त्यांचे वकील नागपूरचे सुरेंद्र गडलिंग यांना गडचिरोली पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. पुणे न्यायालयाने या दोघांना ट्रान्झिट रिमांड मंजूर केला होता. त्यानुसार या दोघांना आज अहेरी येथील न्यायालयात हजर केले गेले. अत्यंत गोपनीय रीतीने मोठ्या सुरक्षा खबरदारीसह अहेरी न्यायालयात या दोघांना आणण्यात आले.
हेही वाचा -महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणाऱ्या 'त्या' तिघांना अटक
या दोघांवर २३ डिसेंबर २०१६ला एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह खनिज टेकड्यांवर ८० मालवाहतूक ट्रक जाळल्याप्रकरणी सहभागी असल्याचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पुणे पोलिसांच्या तपासात गडलिंग यांच्या घरी धाड टाकली असता या धाडीतून मिळालेल्या संगणक हार्ड डिस्कमधून वरिष्ठ नक्षल नेत्यांशी असलेल्या पत्रांचा खुलासा झाला होता. यात जाळपोळ झालेल्या भागात संपर्क वाढ, पैशाचा पुरवठा, मेळावे-बैठक घेत कॅडर मध्ये चैतन्य निर्माण करणे आदींचा उल्लेख होता. या दोघांनी जाळपोळीसाठी वातावरण निर्मिती आणि पोलीस पथक तैनाती, सुटकेचे मार्ग याबाबत गडचिरोली आणि छत्तीसगड सीमावर्ती भागात रेकी केल्याचे सूत्रांचे मत आहे.

हेही वाचा -मुंबईत आईसह चिमुकलीची हत्या, स्वयंपाक घरात सापडले अर्धवट जळालेले मृतदेह
या दोघांनाही गडचिरोली पोलिसांनी १४ दिवस पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने ११ दिवसांची कोठडी दिली आहे. राव-गडलिंग यांच्या वकिलांनी मात्र पुणे पोलिसांची विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल मूळ एफआयआर रद्द करून अटकेतील सर्वांना सर्वोच्च न्यायालयात जामीन मिळणे जवळपास निश्चित झाल्याने त्यांना अन्य गुन्ह्यात अडकविण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. गडचिरोली पोलिसांचा ताजा एफआयआर रद्द व्हावा आणि दोघांना जामीन मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES