• A
  • A
  • A
भटाडी कोळसा खाण; कामगाराच्या हातात डेटोनेटरचा स्फोट, दोन्ही हात निकामी

चंद्रपूर - जिल्ह्यातील भटाडी येथील खुल्या खाणीमध्ये डेटोनेटरचा स्फोट होऊन रमेश बालाजी इटनकर नामक कामगार जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण असून वेकोली (वेस्टर्न कोलफील्डस लिमीटेड) प्रशासनाचे कामगार सुरक्षेवर पुन्हा एकदा दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र


चंद्रपूर येथून काही किलोमीटर अंतरावर भटाडी खुल्या खदानी मध्ये स्फोटासाठी डेटोनेटरचा वापर केला जातो, दरम्यान कामगार रमेश इटनकर डेटोनेटर असलेला बॉक्स घेऊन जात असताना अचानक मोठा स्फोट झाला, या स्फोटामध्ये इटनकर गंभीररीत्या जखमी झाले. घटनेनंतर इतर कामगारांनी इटनकर यांना वेकोली रुग्णालयात दाखल गेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वाचा - जिल्ह्यातील पहिल्या आयएसओ मानांकित शाळेत महिला असुरक्षित

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES