• A
  • A
  • A
जिल्ह्यातील पहिल्या आयएसओ मानांकित शाळेत महिला असुरक्षित

चंद्रपूर - जिल्ह्यातील प्रथम आयएसओ प्रमाणित असलेली चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेली कोलारा जिल्हा परिषदेच्या शाळेत महिला कर्मचारी असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. शाळेतील स्वयंपाकीन व मदतनीस बरोबर शाळेतील शिक्षक नेहमी असभ्य वर्तन करून अश्लिल शब्दात बोलत असतात, अशी तक्रार या महिलांची आहे. मात्र, ही तक्रार नोंदविण्यास पोलीस कुचराई करीत आहे.


यापुर्वी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा हा प्रकार उजेडात आला आहे. कोलारा येथील शाळेत सायसे नावाचे सहाय्यक शिक्षक कार्यरत आहेत. हे शिक्षक शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या महिला स्वयंपाकिन आणि मदतनीसांना नेहमी असभ्य वागणूक देतात, तसेच त्यांच्याशी अश्लील शब्दांत संभाषण करतात. या महिलांनी शिक्षक सारये यांच्या विरोधात असभ्य वर्तन व आश्लिल शब्दात बोलने या विषयीची तक्रार १७ ऑगस्ट २०१८ ला तत्कालीन मुख्याध्यापक अशोक वैध यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्या नुसार शिक्षणाधिकारी चंद्रपूर यांना ६ डिसेंबर २०१८ ला शाळेतील प्रकाराविषयीची माहिती देवून गांभीर्याने चौकशी करून कार्यवाही करण्याकरिता पत्र सुद्धा देण्यात आले होते. मात्र, या संदर्भात शिक्षण विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

वाचा- चोरट्याची शक्कल, सीसीटीव्हीपासून चेहरा लपवण्यासाठी टोपलीचा केला वापर
त्यामुळे या त्रासाला कंटाळून या महिलांनी थेट पोलिसांत धाव घेतली. मात्र, पालिसांनीही गुन्हा दाखल करण्याऐवजी हा प्रकार शिक्षण विभागाशी संबंधित असल्याने तुम्ही तिथे तक्रार करा असा अजब सल्ला दिला. एकीकडे शासन महीला सुरक्षाच्या बाबतीत जागृत असताना दुसरीकडे महीलावर अन्याय होताना दिसत आहे. त्यामुळे या महिलांनी दाद मागायची तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES