• A
  • A
  • A
..तर कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांना झोडपून काढू, नगरसेवक पप्पू देशमुखांचा इशारा

चंद्रपूर - कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ बुधवारी जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी असंघटित कामगारांचा अंत पाहू नये. मागण्या पूर्ण न झाल्यास कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना रस्त्यावर आणून झोडपून काढेन, असा गर्भित इशारा पप्पू देशमुख यांनी आंदोलनात दिला.


कामगार या अन्यायकारक व्यवस्थेला धडा शिकवतील. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका, उज्वल कन्स्ट्रक्शन येथे शेकडोंच्या संख्येने असंघटित कामगार काम करतात. मात्र, या कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क नाकारले जातात. या कामगारांना नियमित वेतन मिळत नाही. त्यांचा अनेक महिन्यांपासून पगार थकीत आहे. कामगारांच्या सुरक्षेबाबत व्यवस्थापन उदासीन आहे. तसेच व्यवस्थापन या कामगारांना अपमानास्पद वागणूक देते. या सर्व मुद्द्यांवर जनविकास सेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा - चंद्रपूरमधील नादुरुस्त सिग्नल ठरतोय नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार
यामध्ये असंघटित कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गांधी चौकापासून जटपुरा गेटमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी पोलिसांनी मोर्चाला रोखण्याचा प्रयत्न केला. पप्पू देशमुख आणि पोलिस यांच्यात शाब्दीक चकमकही झाली. देशमुख यांनी आक्रमक होत सुरक्षा कठड्याला न जुमानता कामगारांना घेऊन जिल्हाधिकारी गेटकडे कूच केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुसऱ्या मार्गावर या कामगारांनी ठिय्या मांडल्यामुळे या दिशेची वाहतूक काही काळ ठप्प पडली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आली. १५ दिवसांच्या आत समस्या निकाली न लागल्यास संघटना आक्रमक होईल. ही आरपारची लढाई असून यानंतर कामगार कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना झोडपून काढणार, असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा - चंद्रपुरात भरदिवसा वाघोबा रस्त्यावर, दुचाकीस्वाराची उडाली भंबेरी; व्हिडिओ व्हायरलCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES