• A
  • A
  • A
चंद्रपूर: नादुरुस्त सिग्नल ठरत आहेत नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार

चंद्रपूर - शहरातील अत्यंत वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या सावरकर चौक आणि जनता कॉलेज चौकात गेल्या अनेक महिन्यांपासून सिग्नल नादुरुस्त आहेत. यात मनपा प्रशासनाने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एकाचा नाहक जीव गेल्याची घटना घडली. त्यामुळे हे नादुरुस्त सिग्नल आणखी किती निरपराध नागरिकांचे जीव घेणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.हेही वाचा- जनता कॉलेजच्या चौकात अपघात, भिकाऱ्याचा जागीच मृत्यू
शहरातील सावरकर चौक आणि आणि जनता कॉलेज हे अत्यंत वर्दळीचे चौक आहेत. जनता कॉलेज चौकाला थेट नागपूर महामार्ग जोडला आहे. महामार्गाच्या जवळच महाविद्यालय, दवाखाना आणि साई मंदिर आहे, तर सावरकर चौक हा मूल, बल्लारपूर बायपास मार्ग आहे. मुख्य बसस्थानकातील बसेसची आवक जावक याच चौकातून होते. तर तुकुम, बंगाली कॅम्प परिसरातील नागरिकांना याच चौकातून जावे लागते. अवजड आणि नागरी वाहतूक एकाच ठिकाणी होत असल्याने अशा संवेदनशील ठिकाणी वाहतूक सुरक्षेची व्यवस्था चोख हवी. मात्र, वास्तविकता नेमकी याच्या उलट आहे. या दोन्ही चौकातील सिग्नल गेल्या अनेक महिन्यापासुन नादुरुस्त आहेत. जनता कॉलेज चौकातून शहरात जाण्याच्या दिशेने असलेल्या सिग्नलमध्ये बिघाड आहे. यातील स्क्रिन खराब झाल्याने हिरवा आणि लाल सिग्नल लागण्यासाठी कालावधीचा अंदाज वाहतूकदारांना घेता येत नाही आणि त्यामुळेच वाहनचालक गोंधळतो. या नादुरूस्त सिग्नलमुळे मंगळवारी बोर्डा येथील एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला.

हेही वाचा- समतादुताच्या मंदिरातून संविधानाचा प्रसार; संत कोंडय्या महाराज मंदिरात उद्देशिकेचे अनावरण
तसेच तुकुमकडून बसस्थानकाकडे आणि बंगाली कॅम्पपासून बसस्थानकाकडे जात असतानाचे सिग्नल नादुरुस्त आहेत. यात सिग्नल सुरू बंद होण्याची वेळ सांगणारी स्क्रीनच बंद आहे. त्यामुळे वाहनचालक आपले वाहन सुरूच ठेवतात. यामुळे प्रदुषण तर वाढतेच सोबत अपघाताचा धोकाही वाढतो. विशेष म्हणजे याच चौकात रामनगर पोलीस स्टेशन आहे. त्यामुळे सभोवत रस्ता सुरक्षेचे फलके लागली आहेत. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. सिग्नल लावणे, त्याची देखभाल करणे महापालिकेची जबाबदारी आहे, मात्र, ही स्थिती पाहता मनपा कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात अशा किती लोकांचे नाहक जीव गेल्यावर मनपा जागी होईल ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा- चंद्रपुरात भरदिवसा वाघोबा रस्त्यावर, दुचाकीस्वाराची उडाली भंबेरी; व्हिडिओ व्हायरल
एकीकडे वाहतूक सुरक्षेवर बोट ठेवून हेल्मेटसक्तीच्या नावाने नागरिकांवर आर्थिक भुर्दंड बसवायचा आणि दुसऱ्या बाजूने त्यांच्याच सुरक्षेचे धिंडवडे काढायचे असे काहीसे चित्र शहरात बघायला मिळत आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES