• A
  • A
  • A
जनता कॉलेजच्या चौकात अपघात, भिकाऱ्याचा जागीच मृत्यू

चंद्रपूर - शहरातील जनता कॉलेज चौकात झालेल्या अपघातात एका भिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तो रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली.


हेही वाचा - समतादुताच्या मंदिरातून संविधानाचा प्रसार; संत कोंडय्या महाराज मंदिरात उद्देशिकेचे अनावरण
जनता कॉलेज चौकातून नागपूर महामार्ग जात असल्याने येथे वाहनांची मोठी वर्दळ असते. आज 5 च्या सुमारास साई मंदिरातील भिकारी रस्ता ओलांडत होता. या वेळी अचानक सिग्नल सुरू झाला. यात एका ट्रकच्या मागच्या चाकात भिकारी चिरडला गेला. भिकाऱ्याचा अपघातात जागीच मृत्यू झाला. यावेळी पाहणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र, मदत करण्याऐवजी हे लोक आपल्या मोबाईलमध्ये चित्रिकरण करीत होते. यावेळी सिग्नलवर तैनात असलेले वाहतूक शिपाई संदीप वझे लगेच घटनास्थळी पोचले. त्यांनी आपल्या रुमालाने मृतकाचे डोके झाकले. त्यांनी याची सूचना वरिष्ठांना दिली. मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा - चंद्रपुरात भरदिवसा वाघोबा रस्त्यावर, दुचाकीस्वाराची उडाली भंबेरी; व्हिडिओ व्हायरल
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES