• A
  • A
  • A
समतादुताच्या मंदिरातून संविधानाचा प्रसार; संत कोंडय्या महाराज मंदिरात उद्देशिकेचे अनावरण

चंद्रपूर - जातीपातीच्या नावावरून सर्वत्र द्वेषाचे वातावरण असताना संत कोंडय्या महाराज मंदिरात प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी गोष्ट घडली. त्यांच्या धाबा येथील मंदिरात संविधानाच्या उद्देशिकेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले आहे. संत कोंडय्या महाराज यांनी आजन्म समतेची शिकवण दिली. त्या समतादुताचा मंदिरातून आता संविधानातील समाजवाद रुजवला जाणार आहे.


हेही वाचा -चंद्रपुरात भरदिवसा वाघोबा रस्त्यावर, दुचाकीस्वाराची उडाली भंबेरी; व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र आणि तेलंगणातील लाखो भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत परमहंस कोंडय्या महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. कोंडय्या महाराज यांनी समाजातील अनिष्ट रुढी, परंपरांविरोधात नेहमीच आवाज उठवला. स्वकृतीतून त्यांनी भेदाभेद मिटवण्याचा प्रयत्न केला. महात्मा बसेश्वर यांच्या विचारांचा, कार्याचा कोंडय्या महाराजांवर विशेष प्रभाव होता. तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या धाबा या गावातून आपल्या कार्याला त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे या दोन्ही राज्यात त्यांना मानणारा मोठा भाविक वर्ग आहे.
भारतीय संविधानाची उद्देशिका आणि कोंडय्या महाराजांची शिकवण याचा भावार्थ एकच आहे. याच भावनेतून कोंडय्या महाराज यांच्या मंदिरात मंगळवारी संविधानाच्या उद्देशिकेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. तेलंगणाचे आमदार कोनेरी कोनप्पा, राजुराचे आमदार संजय धोटे यांच्या हस्ते फलकाचे अनावर करण्यात आले.

हेही वाचा -शाळांनी पार्किंगची व्यवस्था करायलाच हवी; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
आता मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या नजरेस उद्देशिका दिसणार आहे. शासकीय कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेची प्रतिमा असते. मात्र, एखाद्या मंदिरात उद्देशिका लावण्याची ही पहिलीच वेळ असावी. हा उपक्रम अत्यंत प्रशंशनीय असल्याचे आमदार संजय धोटे यांनी म्हटले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष अमर बोडलावार, सचिव किशोर अगस्ती, जि.प. सदस्य वैष्णवी बोडलावार, अरुण कोडापे, सरपंच रोषणी अनमुलवार, बबन पत्तीवार, अरुन वासलवार, नामदेव सांगडे, अनिल देशमुख, अ.तू.काटकर उपस्थित होते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES