• A
  • A
  • A
चंद्रपुरात भरदिवसा वाघोबा रस्त्यावर, दुचाकीस्वाराची उडाली भंबेरी; व्हिडिओ व्हायरल

चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र वसाहतीत पुन्हा एकदा वाघाचा वावर बघायला मिळाला आहे. चंद्रपूर वीज केंद्रातील राख साठवण केंद्राला जोडणाऱ्या भागात मुबलक छोटे वन्यजीव आणि पाणीसाठा यामुळे बिबटे आणि वाघांचा नेहमीच वावर असतो.


वीज केंद्र परिसरात वाघाच्या एका कुटुंबाचे वास्तव्य असल्याने गेल्या २ वर्षांपासून या भागात अधिक काळजी घेतली जात आहे. पर्यावरण चौक भागातील मार्गावर रस्ता ओलांडत असलेल्या वाघाचे नागरिकांना अनेकदा दर्शन झाले आहे. मात्र, ऐन दुपारी थेट दुचाकीस्वारावर वाघोबा चाल करून जात असलेला व्हिडिओ वायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाघोबांनी जरा आक्रमक होत रस्त्याकडे चाल केली आणि या भागात असलेल्या दुचाकीस्वारांची उडालेली घाबरगुंडी या व्हिडिओत कैद झाली आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 'बीआरएसपी'चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
ऐन वर्दळीच्या रस्त्यावर अचानक आलेल्या या वाघोबांनी काही क्षणांसाठी काळजाचा ठोकाच चुकवला. या भागात सतत वाघोबांचे दर्शन होत असल्याने वनविभागाच्या निर्देशांनंतरही वीज केंद्र परिसरातील झुडुपांची तोडणी मात्र झालेली नाही. घाबरगुंडीचा हा व्हिडिओ वायरल झाला असून वाघोबाच्या आक्रमकतेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES