• A
  • A
  • A
शाळांनी पार्किंगची व्यवस्था करायलाच हवी; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

चंद्रपूर - शहरातील बीजेएम कारमेल अकॅडमी शाळेतील यशराज चहांदे या ९ वर्षीय विद्यार्थ्याचा स्कुलबस खाली चिरडून मृत्यू झाल्याने शाळेतील पार्किंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यावर शिवसेनेने आता आक्रमक भूमिका घेतली असून सर्व शाळांनी पार्किंगची त्वरित सुविधा करावी, असा इशारा देण्यात आला आहे. एक महिन्याच्या आत शाळांनी यावर पाऊल न उचलल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शहरात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला.


शहरातील अनेक इंग्रजी शाळांमध्ये पार्किंगची मोठी समस्या आहे. बाहेरच्या स्कूल बसला आत येऊ दिले जात नाही. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतही शाळा व्यवस्थापन कमालीचे उदासीन दिसते. याच समस्येतून यशराज चहांदे या तिसरीतील विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला. शहरातील माउंट कॉन्व्हेंट, सेंट मेरी, विद्या विहार, लोकमान्य टिळक, पटेल हायस्कूल, चांदा पब्लिक स्कूल, भवानजी भाई चव्हाण, जनता महाविद्यालय कोचिंग क्लासेस या शाळेत देखील हीच स्थिती आहे. त्यामुळे भविष्यात अशी दुर्घटना होण्याची भीती सर्वाधिक आहे.
हेही वाचा - राजू रेड्डीला काळ्या यादीत टाका अन्यथा आंदोलन करू; मनसेचा एसीसी सिमेंट कंपनीला इशारा
या शाळांनी पार्किंगची व्यवस्था आपल्या आवारात करावी, विद्यार्थ्यांना स्कूल बसपर्यंत सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारी व्यवस्थापनाने करावी. शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, अशा प्रमुख मागण्या सेनेने केल्या आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी, वाहतूक विभाग आणि शिक्षण विभागाला निवेदन देण्यात येणार आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास सेना स्टाईलमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी शहर प्रमुख नगरसेवक सुरेश पचारे, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, डॉ. भारती दुधानी, जयदीप रोडे उपस्थित होते.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 'बीआरएसपी'चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES