• A
  • A
  • A
राजू रेड्डीला काळ्या यादीत टाका अन्यथा आंदोलन करू; मनसेचा एसीसी सिमेंट कंपनीला इशारा

चंद्रपूर - एसीसी सिमेंट कंपनीने कंत्राटदार राजू रेड्डी यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा कंपनीसमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला. घुग्गुस येथील एसीसी सिमेंट कंपनीतुन विक्रीसाठी नसलेल्या सिमेंटची बाजारात विक्री केली जात आहे. हा काळा बाजार काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप मनसे सैनिकांकडून करण्यात आला.


घुग्गुस येथील एसीसी कंपनीचे सिमेंट फक्त शासकीय कामाकरिता वापरले जाऊ शकते. मात्र, त्याचा उपयोग खुल्या बाजारात करण्यात येत असल्याचे समोर आले होते. हे सिमेंट कंत्राटदार राजू रेड्डी यांच्याकडून आले होते, अशी कबुली पकडण्यात आलेल्या आरोपीने दिली होती. हा प्रकार लक्षात आल्यावरही सिमेंट कंपनीने कुठलीही तक्रार या विरोधात नोंदविली नाही. मात्र, हे प्रकरण प्रसार माध्यमांनी लावून धरल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर राजू रेड्डी यांना घुग्गुस पोलिसांनी चौकशीकरिता बोलाविले. यानंतर रेड्डी यांनी न्यायालयात धाव घेतली.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 'बीआरएसपी'चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
रेड्डी यांचे नाव समोर आले असताना देखील कंपनीने त्यांचे नाव अद्याप काळ्या यादीत टाकले नाही. याचा अर्थ सिमेंटच्या काळ्या बाजारात कंपनीच्या काही अधिकाऱ्यांचा देखील सहभाग आहे, असा आरोप मनसेचे जिल्हा संघटक राजू कुकडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला. रेड्डी यांना काळ्या यादीत टाकावे अन्यथा ६ आणि ७ फेब्रुवारीला कंपनीच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेत कुकडे यांच्यासह वनिता चिलके, राजू बघेल उपस्थित होते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES