• A
  • A
  • A
घोषणा केवळ घोषणाच राहतात, आम्ही लढा देऊ - रमेशचंद्र दहीवडे

चंद्रपूर - केंद्र सरकारच्यावतीने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज संसंदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थ संकल्पात असंघटित कामगारांना मासिक ३ हजार रुपये सेवानिवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर ज्येष्ठ कामगार नेते रमेशचंद्र दहीवडे यांची प्रतिक्रिया आली आहे.



हेही वाचा - BUDGET-2019: अंतरिम अर्थसंकल्पातून मोदींचा हेलिकॉप्टर शॉट..?
दहीवडे म्हणाले, केंद्र सरकारने घोषित केल्यानुसार असंघटित कामगारांना कमीत कमी १८ हजार रुपये वेतन द्यावे, या मागणीला घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही लढे देत आहोत. मात्र, किमान वेतन १८ हजार घोषित झाले नाही. याप्रमाणेच या बजेटमध्ये देखील अशा प्रकारची तरतूद नाही. जे ३ हजार रूपये त्यांनी सांगितले हीदेखील आमचीच मागणी होती, जी त्यांनी मान्य केली. मात्र, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी सुध्दा आम्हाला लढा द्यावा लागेल, कारण घोषणा या केवळ घोषणाच असतात. त्यामुळे, या लढ्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - BUDGET 2019 : कामगारांना ७ हजारांचा बोनस; अर्थसंकल्पात मोठी घोषणा



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES