माना समाजाकडून खासदार अशोक नेतेंचा निषेध; आरक्षणास विरोध केल्याचा आरोप
चंद्रपूर - चिमूर- गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार अशोक नेते यांनी एका कार्यक्रमात 'माना' समाजाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात चिमुरात आज निषेध मोर्चा काढण्यात आला.
खासदार नेते यांनी सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे २१ जानेवारीला आयोजित कार्यक्रमात माना जमातीला मिळालेल्या आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केले होते. यासंदर्भातील व्हिडिओही चिमूर परिसरात व्हायरलही झाला होता. या वक्तव्याचे पडसाद चिमुरात दिसून आले. यावेळी माना समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले तसेच बॅनर, फलक झळकविण्यात आले. आंदोलकांनी खासदार नेतेंविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. उपविभागीय अधिकाऱ्यास निवेदन देऊन अंसतोष व्यक्त करण्यात आला. हेही वाचा- अण्णांनी आंदोलन मागे घ्यावे; सुधीर मुनगंटीवारांची विनंती नालुनंगपेन मुठवा कोलासूर पेनंठाना ट्रस्ट गडबोरी येथे गोंड समाजाद्वारे राष्ट्रीय गोंडवाना महासम्मेलन आणि गोंड संस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार अशोक नेतेंना उद्घाटक म्हणून बोलत होते. त्यावेळी बोलतांना त्यांनी धनगर व माना जमातीला आरक्षण मिळू देणार नाही, असे वक्तव्य केले होते.