• A
  • A
  • A
चंद्रपुरात बीआयटी कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू, घातपाताचा संशय

चंद्रपूर - बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कार्यरत असणाऱ्या तसेच या संस्थेतील अन्यायग्रस्त कर्मचार्‍यांचे नेतृत्व करणाऱ्या अमर नगराळे या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला. हा मृत्यू अपघात आहे की, घातपात याबाबतीत कर्मचाऱ्यांमध्ये संशय आहे.


अॅड. बाबासाहेब वासाडे यांच्या बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना वेळेवर पगार मिळत नाही. अनेक कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा तसेच जीवन विम्याचा प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील कर्मचाऱ्यांच्या समस्या कायम आहेत. यामुळे वैतागलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी या संस्थेच्या व्यवस्थापनाविरोधात बंडाचे हत्यार उपसले आहे. अमर नगराळे हा यापैकीच एक होता. तो बीआयटी संस्थेत 'लॅब असिस्टंट' म्हणून कार्यरत होता. तसेच तो शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचा अध्यक्षदेखील होता. वासाडे यांच्या संस्थेत होणाऱ्या गैरप्रकाराबद्दल तो सातत्याने आवाज उठवत होता. काल (मंगळवार) रात्री साडेदहाच्या सुमारास तो घरी परतत असताना बामणी येथील कोठारी मानोरा मार्गावर त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा -एकाच वेळी चार वाघांचे दर्शन, चंद्रपूर जिल्ह्यातील एकारा-मेंडकी गावातील दुर्मिळ घटना
हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळाले नाही. तसेच या अपघातामध्ये अमरच्या फक्त डोक्याला जबर मार लागलेला आहे. या अपघातामुळे बीआयटी संस्थेच्या विरोधात बंड करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे. पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी अमरचा मृतदेह बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे.
हेही वाचा -चंद्रपुरमध्ये वन्यजीव आणि माणसांमधला संघर्ष शिगेला, तोडग्यासाठी परिषदेचे आयोजन

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES