• A
  • A
  • A
चंद्रपुरमध्ये वन्यजीव आणि माणसांमधला संघर्ष शिगेला, तोडग्यासाठी परिषदेचे आयोजन

चंद्रपूर - ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा-अवळगाव परिसरात वन्यजीव-मानव संघर्ष शिगेला पोचला आहे. हिंस्र प्राणी आता थेट गावात येऊन हल्ला करू लागले आहेत. त्यामुले येथील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी येत्या 15 फेब्रुवारीला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

आतापर्यंत जंगलात जाणाऱ्या नागरिकांवर हल्ले होत होते. आता मात्र हिंस्र प्राणी गावात येऊ लागले आहेत. हळदा, अवळगाव, चिचगाव येथे अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचे जीवन जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अनेक निष्पाप नागरिकांचे यात नाहक जीव गेल्याने नागरिकांमध्ये दहशतीसह प्रचंड संताप आहे. नागरिकांचे सामान्य जीवन यात मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे. वाघाच्या दहशतीने नागरिकांनी आपल्या शेतात जाणे बंद केले.

हेही वाचा - ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल आज मुंबईत

येथे रेशीमचे उत्पादन घेतले जाते मात्र मागील काही दिवसांपासून तेही ठप्प आहे. अश्यावेळी एखादी घटना घडल्यास येथील नागरिकांचा संताप उफाळून येतो. त्यातून अनेकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी श्रमिक एल्गार संघटनेच्या नेतृत्वात 15 फेब्रुवारीला हळदा- आवळगाव परिसरात एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा - कोल्हे दाम्पत्याच्या कार्यावर 'पद्मश्री'ची मोहोर, मेळघाटला पुरस्कार समर्पित

यामध्ये तज्ज्ञ मंडळींसह वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक देखील असणार आहे. चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अनेकदा स्थानिकांच्या सूचनांना डावलले जाते. मात्र, त्यांना सुद्धा आपले मत आहे. ते स्वतः पीडित असल्याने ते यावर योग्य उपाय सुचवू शकतात. त्यांची बाजू जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. याबाबतची माहिती श्रमिक एल्गार संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी अॅड. पारोमिता गोस्वामी, विजय सिद्धावार उपस्थित होते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES