• A
  • A
  • A
स्वच्छता अभियान केवळ सेल्फीपुरतेच; कुडकेलवार करताहेत स्वच्छतादूताचे कार्य

चंद्रपूर - प्रशासन आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत अभियानाची खरी सुरूवात झाली. पण ही जागृती केवळ 'सेल्फी' घेण्यापर्यंतच दिसली. आता त्याची हवा ओसरली. यामुळे पुन्हा स्थिती जैसे थेच दिसून येत आहे, अशा वेळी स्वच्छतादूत विनोद कुडकेलवार यांनी या कार्यासाठी स्वतःला झोकून दिले आहे.


हेही वाचा - नवमतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत मतदारांना जागृत करावे - जिल्हाधिकारी
कुडकेलवार हे गेल्या ४ वर्षांपासून विविध स्तरावरून स्वच्छतेच्या कामासह जागृतीसुध्दा करत आहेत. याचा संदेश देणारा एक सदरा त्यांनी तयार केला आहे. तो परिधान करून ते जागोजागी स्वच्छतेचा संदेश देत फिरत आहेत. ते या कार्याकडे कसे वळले ही गोष्टसुद्धा मनोरंजक आहे. कुडकेलवार यांचे वजन अधिक झाल्याने ते आझाद बागेत नियमितपणे पोहायला यायचे. मात्र, यानंतरही त्यांच्या वजनात फारसा फरक पडला नाही. कुडकेलवार यांना अध्यात्माची ओढ असल्याने त्यांना याचा पर्यायही यातच सापडला. तेव्हापासून म्हणजे २०१४ पासून त्यांचे हे कार्य अखंड सुरू आहे.

हेही वाचा - गोरक्षण संस्थेतूनच कत्तलीसाठी जनावरांची तस्करी, संस्थेचा अध्यक्ष नरेश निकम फरार
स्वच्छतेचा संदेश देणारा सदरा घालून ते दररोज आझाद बागेत जातात. यावर महापुरुषांचे चित्रदेखील आहेत. हे महापुरुष आपले खरे मार्गदर्शक असल्याचे कुडकेलवार सांगतात. बागेत तसेच शहरात फेकुन देण्यात आलेले प्लास्टिक, कागद ते आपल्या पिशवीत गोळा करतात. यावेळी ते नागरिकांना त्यांच्यावर असलेली स्वच्छतेची जबाबदारी समजावून सांगतात. मात्र, त्यांनी सांगितलेले अस्वच्छता पसरविणाऱ्या अनेकांना आवडत नाही. त्यांच्या सांगण्याकडे ते दुर्लक्ष करतात. काही तर त्यांना चक्क वेडा ठरवून मोकळे होतात. कुडकेलवार शाळेत जाऊनही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आता यातही अडथळा निर्माण होऊ लागला. शाळा आता परवानगी घेऊन येण्याचे सांगतात. कुडकेलवारांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाकडून फारसा पाठिंबा न मिळणे साहजिक आहे. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही कुडकेलवारांनी आपले कार्य प्रामाणिकपणे अविरत सुरू ठेवले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आझाद बागेत मुतारीची सुविधा झाली. त्यांच्या सेवेत आता आणखी भर पडली आहे. वैशाली डोंगरे त्यांचा मुलगा यश डोंगरे आणि यशची चुलत बहीण हेसुद्धा कुडकेलवारांच्या कार्याला हातभार लावत आहेत. स्वच्छतेच्या नावावर कोट्यवधी खर्च होत असताना याचा खरा शिलेदार असलेले विनोद कुडकेलवारांचे कार्य मात्र अजूनही दुर्लक्षित आहे. हीच खरी शोकांतिका आहे.
हेही वाचा - अधिकारी, सत्ताधाऱ्यांच्या संगणमताने कोळशाची तस्करी - वडेट्टीवार

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES