• A
  • A
  • A
नवमतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत मतदारांना जागृत करावे - जिल्हाधिकारी

चंद्रपूर - देशात व राज्यात या वर्षात निवडणुका होत असून या निवडणुकीत मतदानापासून कुणीही वंचित राहता कामा नये. अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.


हेही वाचा - धुळे शहरात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शपथ
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय मतदान दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी घनशाम भुगावकर, उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, तहसिलदार संतोष खांडरे आदी उपस्थित होते.
डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी नवमतदार उपस्थित आहेत. त्यांनी आपल्या आजूबाजूच्या नवमतदारांना नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहीत करावे. विविध ऑनलाईन माध्यमांद्वारे आपले नाव मतदार यादीत आहे अथवा नाही याबाबतची खात्री करता येते. त्यामुळे या नव्या सुविधांचा वापर तरुण पिढीने करावा व इतरांनादेखील याबाबत अवगत करावे.
हेही वाचा - बोगस मतदार यादीमागे राजकीय पक्षाचा हात - संजय निरुपम
मुख्य निवडणूक आयुक्त यांचा संदेश उपस्थितांना ऐकविण्यात आला या संदेशाचा दाखला देत नवमतदारांनी चुकीचे मतदान न करता वैध व नैतिक मतदान करावे. वैध मतदान करणे अतिशय गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते स्मृती खाडे, शैलेस पांडव, पंकज शर्मा या नवमतदारांना निवडणूक ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरीत करण्यात आले.
हेही वाचा - मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचे नमो अॅप; बुथप्रमुखांना...

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES