• A
  • A
  • A
गोरक्षण संस्थेतूनच कत्तलीसाठी जनावरांची तस्करी, संस्थेचा अध्यक्ष नरेश निकम फरार

चंद्रपूर - जनावरांची तस्करी करणाऱ्या एका तस्कराने पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांच्या अंगावर वाहन चालवून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाहनातील जनावरे ही यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील एका गोरक्षण संस्थेतील होती आणि त्या संस्थेकडून कत्तलीसाठी जनावरे पुरवली जात असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलिसांनीदेखील या माहितीला अधिकृत दुजोरा दिला आहे. दरम्यान, संस्थेचा अध्यक्ष नरेश निकम हा सध्या फरार आहे.


प्रकाश मेश्राम हे खांबाडा नाक्यावर तैनात असताना गोवंश घेऊन जाणाऱ्या वाहनाने त्यांना चिरडले. या प्रकरणात वणी तालुक्यातील श्रीराम गोरक्षण संस्थेचे नाव आले आहे. संस्थेचा अध्यक्ष नरेश निकम यानेच तस्करांना कत्तलीसाठी जनावरे पुरवली होती, असा कबुलीजबाब अटकेतील आरोपींनी दिला आहे. घटनेच्या दिवशी तो जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनांसोबत होता. मूळचा वणी येथील नरेश निकमचा काही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी जवळचा संबंध आहे. २० जानेवारीला वणी येथून रात्री २ टाटा योद्धा या चारचाकी वाहनातून गोवंश घेऊन येणाऱ्या वाहनाने खांबाडा चेकपोस्टवर तैनात पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांना चिरडले. ते जागीच ठार झाले.

या घटनेने पोलीस प्रशासन हादरले. इम्तियाज अहमद फैय्याज आणि मोहम्मद कुरेशी याला घटनास्थळावरून पोलिसांनी अटक केली. दुसऱ्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून मोहम्मद फहीम शेख आणि आदिल खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अतुल गौरकर आणि पवन उरकुंडे यांना देखील वणी येथून अटक करण्यात आली. या सर्वांवर भारतीय दंड विधान ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात या आरोपींनी नरेश निकम यांच्या संस्थेतील ही जनावरे असल्याची माहिती दिली. त्यानेच ती तस्करांना दिली. एवढेच नव्हे तर गोवंश घेऊन जाणारी वाहने जिल्ह्याबाहेर काढून देण्याची जबाबदारीसुद्धा त्याने घेतली होती. त्यासाठी या २ वाहनांच्या समोर तो पायलटिंग करत खांबाडा चेकपोस्टपर्यंत आला. मात्र, मेश्राम यांना चिरडल्यानंतर त्याने पळ काढला, असे आरोपींचे म्हणणे आहे.

आता पोलीस त्याच्या मागावर आहेत. पोलिसांनी २४ जनावरे ताब्यात घेतली आहेत. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत असल्याचे त्यांनी सांगितले.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES