• A
  • A
  • A
आरोग्य योजनेच्या लाभार्थ्याकडून डॉक्टरने उकळले पैसे, दुहेरी लाभ घेणाऱ्या रुग्णालयाविरोधात तक्रार

बुलडाणा - महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या रुग्णाकडून रुग्णालयाने पैसे उकळल्याचा प्रकार घडला आहे. शासन तसेच रुग्णाकडून दुहेरी लाभ घेणाऱ्या डॉ. मेहेत्रे रुग्णालयाविरोधात मोताळा तालुक्यातील गोपाल हरिसिंग ब्राम्हण यांनी तक्रार दाखल केली आहे.


हेही वाचा - 'या' चुका केल्यास फेटाळला जाऊ शकतो तुमचा विम्याचा दावा
तक्रारीनुसार डॉ. मेहेत्रेंच्या रुग्णालयात महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेत २१ नोव्हेंबर २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंत नोंदणी केली होती. यादरम्यान ब्राम्हण यांच्याकडून डॉ. मेहेत्रे रुग्णालयाने प्रत्येकी ११०० रुपये प्रमाणे डायलिसिसचे बिल घेतले. तसेच बाहेरच्या मेडिकलमधून औषधे आणायला लावली.
या प्रकरणी ९ फेब्रुवारीला महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेच्या जिल्हा सनमव्यक सुनील वाठोरे आणि त्यांच्या पथकाने चौकशीसाठी ब्राम्हण आणि डॉ. मेहेत्रे यांच्या जवळील बिलाची प्रती ताब्यात घेतल्या आहेत. चौकशी करून तक्रारीत सत्यता आढळल्यास वरिष्ठांकडे कारवाईसाठी अहवाल पाठविले जाईल, असे जिल्हा सनमव्यक सुनील वाठोरे यांनी सांगितले. या प्रकाराबाबत डॉ. राहुल मेहेत्रे यांनी बोलण्यास नकार दिला.
हेही वाचा - हिंगोलीच्या आरोग्य शिबिरात रुग्णांची गर्दी
राज्यातील दारिद्र्यरेशेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्र्यरेशेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना, तसेच अवर्षण ग्रस्त १४ जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेत किडनीचा आजार असणाऱया रुग्णांना मोफत डायलिसिस उपचार देण्यात येतात. या योजनेत रुग्णाची नोंदणी झाल्यावर डायलिसिस तसेच औषधांसह इतर सुविधा रुगांना मोफत देण्यात येतात.
हेही वाचा - पुणतांब्यातील शेतकरी मुलींचे अन्नत्याग आंदोलन पाचव्या दिवशी सुरूच

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES