• A
  • A
  • A
हुतात्मा जवानाच्या ४ महिन्याच्या मुलाला अंत्यदर्शनासाठी आणले... हृदय हेलावून टाकणारा क्षण

बुलडाणा - भारतीय लष्करात ४० कोर इंजिनीयरींग सिग्नल रेजीमेंटमध्ये कार्यरत असलेले सिग्नलमॅन अनिल शामराव वाघमारे (वय २८ वर्ष) हे जम्मू व काश्मीर राज्यात सियाचीन क्षेत्रात कर्तव्यावर असताना हुतात्मा झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी ८ फेब्रुवारी २०१९ ला त्यांचे मूळ गाव असलेल्या सावरगाव डुकरे (ता. चिखली) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात पार्थिव पोहोचल्यानंतर संपूर्ण गाव व पंचक्रोशीतील नागरिक यांनी गावात अनिल वाघमारे यांच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती. पार्थिवाची संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रत्येक गावकऱ्याचे डोळे पाणावले होते.


अनिल वाघमारे यांना ४ महिन्यांचा मुलगा आहे. जेव्हा पार्थिव सरणावर आणण्यात आले, तेव्हा चिमुकल्या प्रज्वलला पित्याच्या अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. हा क्षण प्रत्येकाचे हृदय हेलावून टाकणारा होता. अनिल वाघमारे यांच्या पश्चात आई तुळसाबाई शामराव वाघमारे, पत्नी किरण अनिल वाघमारे, मुलगा प्रज्वल अनिल वाघमारे, बहीण सविता रवि शेळके व उषा विजय आमले असा परिवार आहे.
हेही वाचा - तंत्रज्ञानाचा वापर करत विदेशी भाजीपाल्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन; बुलडाण्याच्या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा
हुतात्मा जवान अनिल वाघमारे यांच्या अंत्यदर्शनासाठी खासदार प्रतापराव जाधव, आमदार हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, माजी आमदार रेखाताई खेडेकर, माजी आमदार धृपदराव सावळे, बाबुराव पाटील, नरेंद्र खेडेकर, सभापती श्वेताताई महाले, रविकांत तुपकर, जिल्हा परिषद सदस्य जयश्री शेळके, सुमीत सरदार, जालिंधर बुधवत, तहशिलदार मनिष गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी महामुने, कर्नल अनिल कुमार साह, कॅप्टन मृदुल रमेश, कल्याण संघटक सुर्यकांत सोनटक्के, अधीक्षक संजय गायकवाड आदींनी पार्थिवावर पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. यावेळी जवळपास ८ ते १० हजार नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा - बुलडाण्यातील दुधलगाव शिवारात वाघ दिसल्याने नागरिक भयभीत
यानंतर सैन्य तुकडीने व पोलीस तुकडीने हुतात्मा सिग्नलमॅन अनिल वाघमारे यांना बंदूकीच्या ३ फैरी हवेत झाडून मानवंदना दिली.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES