• A
  • A
  • A
तंत्रज्ञानाचा वापर करत विदेशी भाजीपाल्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन; बुलडाण्याच्या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा

बुलडाणा - आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एका तरुण शेतकऱ्याने विदेशी भाजीपाला सेंद्रिय पध्दतीने पिकवून भरघोस उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. जेमतेम अर्धा एकर शेतीवर रोजगार आणि उत्पनाचे वेगळे साधन त्यांनी निर्माण केले आहे. पाहुया बुलडाण्याच्या शेतकऱ्याची ही यशोगाथा...


हेही वाचा - बुलडाण्यातील दुधलगाव शिवारात वाघ दिसल्याने नागरिक भयभीत
बुलडाणा जिल्ह्यातील येळगावच्या विष्णू गडाख या तरुण शेतकऱ्याचे शिक्षण बीएपर्यंत झाले असून त्यांची वडिलोपार्जित शेती धरणामध्ये गेल्याने त्यांच्याकडे केवळ दीड एकर शेतीच शिल्लक राहिली आहे. प्रकल्पग्रस्त असल्यामुळे आपल्याला नोकरी मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. पण नोकरीसाठी सर्व प्रयत्न केल्यानंतर पदरी निराशा आल्यामुळे वडिलोपार्जित शेतीच करायचे त्यांनी ठरवले. पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नव्हते. अशा परिस्थितीही खचून न जाता त्यांनी आपल्या कल्पक बुद्धीचा वापरत करत इंटरनेटच्या माध्यमातून यू ट्युबवरून शेती विषयक माहिती घेतली. यूट्युबवरील विदेशी भाजीपाल्याबद्दल सर्वकष माहिती मिळवत आपल्या शेतातील एका-एका गुंठ्यावर वेगवेळ्या विदेशी भाज्यांची लागवड केली. त्यांच्या अर्ध्या एकर शेत जमिनीवर सद्या अमेरिकन ब्रोकोली, लेटस सलाद, रेड कॅबेज, ग्रीन कॅबेज, येलो-ग्रीन झुकिनी, सोनेरी बेबीकॉन, रेड रेडिश यासह देशी वाण नवलकोल, शलगामची लागवड शेतात केली आहे.
हेही वाचा - आगामी लोकसभा निवडणूक लढवणारच - डॉ. रामदास भोंडे
भाजीपाला विदेशी असल्या तरी तो स्वदेशी पद्धतीने म्हणजेच सेंद्रिय पद्धतीने पिकवला. गडाख हे सर्व विदेशी भाज्यांना शेणखत, गांडूळ खत व जैविक औषधाचा उपयोग करून भरघोस उत्पादन घेत आहेत. शेतामध्ये उत्पादित केलेला विदेशी भाजीपाला ते स्वतः बाजार पेठेत जाऊन विकतात. दररोज त्यांना ७००-८०० रुपये मिळत असून उत्पादन खर्च वजा करता महिन्याकाठी २०-२५ हजार रुपये ते कमवतात.

हेही वाचा - चिखली तालुक्यातील शेलोडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी
बाजारामध्ये विदेशी भाज्या पाहून ग्राहक त्यांना या भाज्यांविषयी विचारू लागले. मात्र, ग्राहक खरेदी करण्यात रस दाखवत नव्हते. त्यामुळे गडाख यांच्या पुढे मोठा पेच निर्माण झाला. यामध्ये सुद्धा त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या विदेशी भाज्यांचे आरोग्य विषयक फायदे शोधून काढून त्या संदर्भाचे माहितीपत्रकच त्यांनी विक्री करताना भाज्यांसमोर लावून ठेवले. त्यामुळे कुतूहलाने ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होऊन माहिती जाणून घेऊन ह्या भाज्या विकत घेऊ लागले. त्यामुळे विष्णू गडाख यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय जोमात सुरु आहे. त्यामुळे तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता किंवा नोकरी न मिळाली तरी खचून न जाता आधुनिक पद्धतीने शेती करून फायदा मिळवता येतो असा आदर्श त्यांनी तरुणांसमोर ठेवला आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES