• A
  • A
  • A
बुलडाण्यातील दुधलगाव शिवारात वाघ दिसल्याने नागरिक भयभीत

बुलडाणा - जिल्ह्यातील दुधलगाव शिवारात वाघ दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, ग्रामस्थांकडून गावाजवळच्या परिसरात वाघ मुक्त संचार करत असल्याची तक्रार वनविभागाला देण्यात आली आहे. मात्र, वनविभाग प्रशासनाकडून तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र


मलकापूर तालुक्यातल्या दुधलगाव खुर्द येथे किनगे यांच्या शेतात २ दिवसाआधी वाघ दिसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. शेतात काम करणाऱ्या मजुरांना किनगे यांच्या शेताला लागुन असलेल्या धामदर्याच्या नाल्यामध्ये वाघ बसलेला दिसुन आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच गावातील एकाला नदी परिसरात वाघ दिसला. या प्रकारामुळे संपूर्ण ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा - पुणतांब्यातील शेतकरी मुलींचे अन्नत्याग आंदोलन पाचव्या दिवशी सुरूच
वनविभागाकडून या सर्व प्रकारचा तपास करण्यात आला त्यावेळी त्यांना वाघाच्या पायाचे ठसे मिळाले. मात्र, हे प्रकरण वनविभाग गांभीर्याने न घेता आज किंवा उद्या रेस्क्यू ऑपरेशन करू, असे म्हणत टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी रवी कोंडावर यांना विचारणा केली असता, त्यांनी नागरिकांना उद्धटपने उत्तर दिले होते. वाघाच्या हल्ल्यात एखाद्या नागरिकांचा बळी गेला, तर त्याला जबाबदार सरकार असेल, असेही ते म्हणाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

विशेष म्हणजे जिल्ह्यात वनपरिक्षेत्र जरी मोठे आले तरी वाघ नाही, असे वनविभाकडून सांगण्यात येते. तर ग्रामस्थ याच परिसरात वाघ दिसल्याचे बोलत आहेत. नेमका वाघ आहे की नाही, याबद्दल आशंका आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ बचाव करून सोक्षमोक्ष लावावा आणि भयभीत झालेल्या ग्रामस्थांना भयमुक्त करावे अशी मागणी केली जात आहे. मात्र, एखाद्याचा जीव गेल्यावरच वन विभाग बचाव कार्य सूरु करणार का ? आणि भयमुक्त कसे करणार ? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES