• A
  • A
  • A
आगामी लोकसभा निवडणूक लढवणारच - डॉ. रामदास भोंडे

बुलडाणा - आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे भाजप नेते डॉ. रामदास भोंडे यांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांतच ते भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बुलडाण्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर टीका केली. पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


येत्या लोकसभा निवडणुकीत कुणी मनाने थकलेला असेल, तर कुणी मनाने दुखावलेला असेल. बाहेरून आलेला वंचितही असेल. यापेक्षा आपण ७० वर्षाचे टिपू सुलतान आहोत. ही निवडणूक आपण माघार न घेता लढू, असे भोंडे म्हणाले. आपण १९९० मध्ये पराभूत झालो होतो. परंतु, तेव्हा आपण कच्चे होतो. आता सत्तरी गाठली असल्याने अनुभवाची शिदोरी आपल्या जवळ आहे. त्यामुळे आपण एक सुलतान म्हणून या निवडणुकीत उभे राहणार आहोत. जिल्ह्यात सर्वत्र आपला दौरा झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनसुद्धा आपल्या पाठीशी राहणार आहे. तसेच, छोट्या पक्षांची आपल्याला साथ आहे. त्याच बळावर आपण आता निवडणूक लढणार आहोत, असे भोंडे म्हणाले.

हेही वाचा - प्रेमीयुगुलाची आत्महत्या; २ दिवसांपासून होते बेपत्ता, विहिरीत आढळले मृतदेह

यावेळी खासदार प्रताप जाधव यांच्यावर त्यांनी टीका केली. प्रताप जाधव हे निष्क्रीय खासदार आहेत. त्यांनी जनतेचा उद्धार करण्यापेक्षा स्वतःचाच उद्धार केल्याने जनतेत त्यांच्याप्रती प्रचंड रोष आहे. खासदार प्रताप जाधव १०० टक्के अपयशी आहेत, अशी टीका भोंडे यांनी केली.

हेही वाचा - बाबा कंबलपोष उरूस; ८९ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

आपण काही मागण्यांकरता ७ डिसेंबर २०१७ रोजी धरणे आंदोलन केले होते. त्या मागण्यांतील अनेक मागण्या मार्गी लागण्याची शक्यता असल्याचे भोंडे यांनी सांगितले. यामध्ये शासकीय महाविद्यालयाची स्थापना, मलकापूर-सोलापूर रेल्वे मार्ग , जिजामाता सरकारी महिला विद्यापीठ, शासकीय फार्मसी महाविद्यालय व शासकीय नर्सिंग कॉलेज, शासकीय शेतकी महाविद्यालय, शासकीय विधी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अ‍ॅग्रो बेस इंडस्ट्रीज व प्रक्रिया केंद्र उभारणे, अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र, बुलडाणा जिल्ह्यात विभागीय विमान सेवा आदी मागण्या आहेत. या मागण्या लवकरच मार्गी लागतील, असे भोंडेंनी सांगितले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES