• A
  • A
  • A
चिखली तालुक्यातील शेलोडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

बुलडाणा - शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतमजूरावर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानकपणे हल्ला केल्याची घटना घडली. विठ्ठल काटे हा शेतमजूर या हल्ल्यात जखमी झाला. ही घटना जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील शेलोडी शिवारात बुधवारी ६ फेब्रुवारीच्या संध्याकाळी घडली. जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून परिसरात भीतीचे वतावरण पसरले आहे.

विठ्ठल काटे, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले शेतमजूुर


हेही वाचा - बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी पोलिसांची धाड, १५ लाखांचा गुटखा जप्त
चिखली तालुक्यातील शेलोडी शिवारात असलेल्या शेतात विठ्ठल काटे हा ३८ वर्षीय युवक शेतमजूरी करतो. बुधवारी ६ फेब्रुवारीला सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान नेहमीप्रमाणे दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीने गव्हाला पाणी देण्यासाठी आपल्या सहकाऱ्यासोबत गेला होता. यावेळी स्प्रिंकलरचा टप्पा बदलत असताना दबा धरून बसलेल्या बिबटयाने अचानकपणे विठ्ठल काटे या शेतमजूराच्या अंगावर धाव घेतली. विठ्ठलच्या समयसूचकतेमुळे गळ्यावर आलेला बिबट्याचा वार हाताने अडवला. मात्र, बिबट्याच्या जबड्यात आलेला हात तर आणि खांद्यामागे मारलेल्या पंजाच्या नखांमुळे गंभीर जखमा झाल्या.
अचानकपणे झालेल्या या हल्ल्यात विठ्ठल आणि त्याचा सहकारी यावेळी चांगलेच घाबरले होते. हल्ल्यानंतरही तो बिबटया तिथेच काही वेळ थांबलेला होता. त्यामुळे जीव मुठीत धरून हे दोघे ही जागेवरुन लवकर हलले नाही. या हल्ल्याच्या नंतर दोघांनी केलेली आरडाओरड शेजारील शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला ऐकू गेली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आपल्या दुचाकीने चिखलीतील एका खासगी रुग्णालयात विठ्ठलला दाखल केले. आयुष्यात पहिल्यांदाच बिबट्या बघितल्याचे सांगत आज मरता-मरता वाचल्याची प्रतिक्रिया विठ्ठलने यावेळी बोलून दाखवली.
हेही वाचा - बुलडाण्यात स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन
या घटनेबद्दल वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळाल्यावर कर्मचाऱ्यांनी जखमींची भेट घेऊन पंचनामा केला आणि मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES