• A
  • A
  • A
लाचखोर मुख्याधिकाऱ्यासह लिपीकाचे निलंबन करा; नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची मागणी

बुलडाणा - शेगांव नगरपालिकेचे लाचखोर मुख्याधिकारी अतुल मनोहर पंत आणि लिपीकाला शासनाने तत्काळ निलंबीत करावे. या मागणीसाठी आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेवर हल्लाबोल आंदोलन केले.


या आंदोलनात 'चोर है, भाई चोर है चौकीदार चोर है' अशा गगनभेदी घोषणांनी नगरपालिका परिसर दणाणुन गेला. शनिवारी १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी पोलिसांची धाड, १५ लाखांचा गुटखा जप्त
शेगांव नगर पालिकेत आज सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये लाचखोर मुख्याधिकारी व लिपीकाविरुध्द निलंबनाचा ठराव मंजुर करावा. या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच इतर राजकीय पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष शकुंतला बुच यांना निवेदन दिले. यावर पुढील बैठकीत आपण ठराव आणू असे आश्वासन नगराध्यक्ष शकुंतला बुच यांनी दिले आहे. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस नगरपालिका परिसरात दाखल झाले होते.


हेही वाचा - बुलडाण्यात स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन
या आंदोलनात नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे, शिवाजी बुरुंगले, रफिया बी फजल शहा, शिवसेनेचे नगरसेवक दिनेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक शैलेष पटोकार यांच्यासह ज्ञानेश्‍वर पाटील, दयाराम वानखडे, शैलेंद्र पाटील, कैलास देशमुख, फिरोज खान, जयंत खेळकर, दिलीप पटोकार, आबीद शहा, शेख असलम, शेख इम्रान, अब्बास बेग, चंद्रकांत माने, राहुल खंडेराव आदींनी सहभाग नोंदवला होता.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES