• A
  • A
  • A
बुलडाणा जिल्ह्यात दोन ठिकाणी पोलिसांची धाड, १५ लाखांचा गुटखा जप्त

बुलडाणा - पोलिसांनी जिल्ह्यात ४ फेब्रुवारी आणि ५ फेब्रुवारीला बुलडाण्यात ३ लाखाचा आणि रायपूरमध्ये १२ लाखाचा गुटखा पकडला. दोन ठिकाणी पोलिसांनी १५ लाखांचा अवैध गुटखा जप्त केला. बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दोन्ही ठिकाणी कारवाई केली.


हेही वाचा - बुलडाण्यात स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन
स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात तीन लाखांचा अवैध गुटखा सोमवारी सायंकाळी जप्त केला. बुलढाणा येथे एका कारमध्ये दोघांकडून हा गुटखा जप्त करण्यात आला. बुलडाणा येथील जयस्तंभ चौकात स्विफ्ट कार (क्र. यु.एच. ४६ एएल ७८३९) मध्ये गुटखा येत असल्याची माहिती गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सदर कार जयस्तंभ चौकात अडवून पंचांसमक्ष तपासणी केली. यावेळी वाहनातील शेख राज मोहम्मद शेख ताज मोहम्मद, फारुख गनी खां कुरैशी (रा. चिखली) यांच्या वाहनात शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला, विमल गुटखा, तंबाखू किंमत ३ लाख 8 हजार आणि वाहनाची किंमती १ लाख ५० हजार असा एकूण चार लाख 58 हजारचा मुद्दे माल आढळून आला. हा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - गरीब रथसह अन्य ३ गाड्यांना शेगाव स्थानकावर थांबा, रणजीत पाटीलानी दाखवला हिरवा झेंडा
दुसऱ्या कारवाईत मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाचे अधिकारी महेंद्र देशमुख यांना रायपूर येथे एका घरामध्ये गुटख्याची पोती असल्याची गोपनीय माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरिक्षक इम्रान इमानदार यांच्यासह रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रशांत सपकाळे, व त्यांच्या पथकाने घरांची झडती घेतली. झडतीत सैय्यद सौदागर यांच्या घरामध्ये ६४ गुटख्यांचे पोती आढळून आली. ही गुटख्याची पोती खाजगी वाहनाने रायपूर पोलीस ठाण्याला जमा केली आहेत. या गुटख्याची अन्न व औषध विभागाचे अधिकारी नितीन नवलकर, नमुना अधिकारी प्रविण ढोके यांनी तपासणी केली. सदर गुटख्याची किंमत १२ लाख रुपये असून सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES