• A
  • A
  • A
बुलडाण्यात स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन

बुलडाणा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह हजारो नागरिक आणि खडकपूर्णा प्रल्पग्रस्तांनी रस्त्यावर मंगळवारी दुपारी औरंगाबाद- अकोला महामार्गावरील देऊळगाव मही येथे चक्क जाम आंदोलन केले. यावेळी संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्पामधून जालना जिल्ह्यात जाणारी मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना रद्द करण्याची मागणी करण्यात आली.


बुलडाण्यातील संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पातील मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना जालना जिल्ह्यातून जात आहे. मात्र, त्या गावातील शेतकऱयांना त्यांना अद्यापही पाणी मिळालेले नाही. तर संत चोखा सागर खडकपूर्णा प्रकल्पात बुलडाण्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे जालन्यातून म्हणजे त्यांच्या मतदार संघातूनच पाणी नेण्याचा घाट घालत आहेत. हे कदापी सहन केले जाणार नाही. या पाण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांच्या भावना तीव्र असून एक थेंब पाणी जरी जालना जिल्ह्यात नेण्याचा प्रयत्न केला तर याठिकाणी रक्ताचे पाट वाहतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला.
हेही वाचा - लग्नाच्या ८ दिवस अगोदरच तरुणीवर काळाचा घाला; केळवण करून परतताना अपघात
बबनराव लोणीकारांनी त्यांच्या जालना जिल्ह्यातील निमना-दुधना प्रकल्पाचा स्रोत असताना बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाण्याचा अट्टाहास का असा प्रश्न आम्हाला पडला आहे? लोणीकरांनी बुलडाणा जिल्ह्यातील पाणी पळवण्याचा प्रयत्न थांबवला नाही तर जिल्ह्यातील शेतकरी याठिकाणी प्राणाची आहुती देतील, असेही यावेळी तुपकर यांनी म्हटले. या रस्तारोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रविकांत तुपकरांसह शेकडो शेतकऱ्यांना देऊळगाव राजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES