• A
  • A
  • A
चक्क कारमधून करायचे जनावरांची चोरी, टोळीतील चौघांना अटक

बुलडाणा - चक्क कारमधून जनावरे चोरणाऱ्या टोळीतील ४ जणांना शेगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. सूत्रधार प्रशांत भटकर याच्यासह ४ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीत वापरल्या जाणारी साहित्य आणि २ कार असा एकूण ७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.


हेही वाचा -गरीब रथसह अन्य ३ गाड्यांना शेगाव स्थानकावर थांबा, रणजीत पाटीलानी दाखवला हिरवा झेंडा

मागील काही दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील विविध भागातून जनावरे चोरी जात असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. यामध्ये मागील आठवड्यात आझाद नगर भागातून एकूण १२ बकऱ्या चोरीला गेल्या होत्या, याबाबत शहर पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर ठाणेदार सुनील हूड यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून संशयित कारची माहिती काढली. जनावरे चोरून नेणाऱ्या टोळीवर नजर ठेवली. ही टोळी आणखी चोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती डी.बी. पथकाला मिळताच त्यांनी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथून प्रशांत पुरुषोत्तम भटकर (वय २३ रा. वाडेगाव ता. बाळापूर) लखन रतन आढाव (वय २६ रा.धनेगाव ता. बाळापूर) सुरज गजानन शेंडे (वय २० रा. मंगरूळ दस्तगीर) चेतन बळीराम ढगे (वय २६ रा. धनेगाव ) या सर्व अकोला जिल्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन शेगावला आणले.

हेही वाचा - शेगाव नगरपालिकेच्या लाचखोर मुख्य अधिकाऱ्यासह लिपीकाला अटक
आरोपींनी कारमधून जनावरे चोरत असल्याची गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापलेल्या २ कारही जप्त करण्यात आल्या. आतापर्यंत या आरोपींनी कारमधून किती जनावरांना चोरले आहे याचा तपास पोलीस करीत आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता नायालयाने त्यांना १ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - विविध मागण्यांसाठी बुलडाणा आरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES