• A
  • A
  • A
गरीब रथसह अन्य ३ गाड्यांना शेगाव स्थानकावर थांबा, रणजीत पाटीलानी दाखवला हिरवा झेंडा

बुलडाणा - नागपूर-पुणे 'गरीब रथ' या सुपरफास्ट एक्सप्रेससह आणखी दोन रेल्वे गाड्यांना शेगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे विभागाकडून थांबा मंजूर करण्यात आला आहे. रविवारी नव्याने थांबलेल्या चेन्नई-जोधपूर या सुपरफास्ट एक्स्प्रेसला राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील आणि खासदार प्रतापराव जाधव यांनी हिरवा झेंडा दाखवून या रेल्वे थांब्याचे उद्घाटन करण्यात आले.


हेही वाचा - पंतप्रधान मोदींचा जम्मू-काश्मीर दौरा; ३ सभा, ४ विविध वेशभूषा

निवडणुका जवळ आल्याने अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या गाड्यांचा थांबा रेल्वे विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये १२११३ आणि १२११४ ही नागपुर-पुणे आणि पुणे-नागपूर सुपरफास्ट गरीब रथला (आठवड्यातून ३ दिवस) शेगावात थांबा देण्यात आला आहे. यासह २२१३७ आणि २२१३८ या नागपूर-अहमदाबाद आणि अहमदाबाद-नागपूर या प्रेरणा एक्सप्रेस (आठवड्यातून ३ दिवस) आणि २२६६३ आणि २२६६४ या चेन्नई ते जोधपूर(साप्ताहिक) सुपरफास्ट एक्सप्रेसलाही शेगावात थांबा मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा - तुमचे प्रेम व्याजासहित परत करणार, लेहवासीयांना पंतप्रधान मोदींचे आश्वासन

या रेल्वे गाड्या आपल्या विनंती आणि पाठपुराव्यावरून मंजूर करण्यात आल्या असल्याचा दावा रणजीत पाटील आणि बुलडाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडून करण्यात आला आहे. रविवारी चेन्नई जोधपूर या सुपरफास्ट एक्स्प्रेसला रणजीत पाटील आणि प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या थांबाचे उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा - आनंद तेलतुंबडेंची अटक बेकायदेशीर, न्यायालयाच्या सुटकेच्या आदेशाने पुणे पोलिसांना दणका
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES