• A
  • A
  • A
शेगाव नगरपालिकेच्या लाचखोर मुख्य अधिकाऱ्यासह लिपीकाला अटक

बुलडाणा - शेगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आणि लिपीकाला १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. शेगाव येथील शासकीय विश्रामगृहात दोघांवर कारवाई करण्यात येत आहे. दोघांनी एका खाजगी प्लॉटचे कमर्शियल बिगर शेती (एन.ए.) गटात नोंद करुन देण्यासाठी ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.



हेही वाचा - 'पीएम किसान योजनेतून मिळणारी ६ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा'
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव नगरपालिकेच्या हद्दीतील एका खासगी प्लॉटचे एन. ए. करण्यासाठी प्लॉट मालक समीर मोरे यांना शेगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, तडजोडी नंतर १ लाख २० हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत मोरे यांनी बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविल्यानंतर पडताळणी करण्यात आली.

हेही वाचा - बुलडाणा जिल्ह्याचे नाव "राजमाता जिजाऊ नगर" करा, शिवसंग्राम पक्षाची मागणी

पडताळणीनंतर आज १ लाख २० हजार रुपयाची लाच मुख्याधिकारी पंत आणि आरती इंगळे हे स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. विशेष म्हणजे, शेगाव शहरात मुख्याधिकरी पंत हे लाच घेताना अटक झाल्याची माहिती पसरताच काही नागरिकांनी फटक्यांची आतिषबाजी केली.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES