• A
  • A
  • A
विविध मागण्यांसाठी बुलडाणा आरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

बुलडाणा - राज्याच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध, कार्यालयीन रचना यांसह विविध प्रलंबित मागण्या पुर्ण करण्याची मागणी राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी शुक्रवारी बुलडाणा येथील कार्यालयात लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बुलडाणा कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामुळे शुक्रवारी 'आरटीओ'च्या कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले.


हेही वाचा -'पीएम किसान योजनेतून मिळणारी ६ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा'
रिक्त पदांची भरती करणे, ब वर्ग पदांची संख्या वाढविणे, पदोन्नतीकरीता असलेले ४ स्तर कमी करणे आदी मागण्या संघटनेकडून केल्या जात आहेत. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलन करून निषेध नोंदविला आहे. मात्र, त्यास प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे या मागण्यांवर त्वरित निर्णय व्हावा यासाठी लेखणी बंद आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा -शेगाव तालुका काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा; अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर
लेखणी बंद आंदोलनात मोटर वाहन विभागाचे अमरावती विभागाचे उपाध्यक्ष गजानन तनपुरे, जिल्हाध्यक्ष अमोल खिरोडकर, सुनील सूर्यवंशी, अनंता सोर, विजय माहुलकर, संतोष घ्यार, किशोर देशमुख, प्रवीण मुंगळे, राजेश काळे, सुनील सोळंकी, रोहित काळे, मिलिंद उईके, नितीन खाचने, वीरेंद्र पटेल, संपदा जाधव, श्रीमती राणे यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा - बुलडाणा जिल्ह्याचे नाव "राजमाता जिजाऊ नगर" करा, शिवसंग्राम पक्षाची मागणीCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES