• A
  • A
  • A
'पीएम किसान योजनेतून मिळणारी ६ हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा'

बुलडाणा - केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली. मात्र, ६ हजारांची मदत म्हणजे या सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ पश्चिमचे अध्यक्ष राणा चंदन यांनी दिली आहे.

राणा चंदन - स्वाभिमानी संघटना नेते


हेही वाचा - सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प असंवैधानिक; सर्वोच्च न्यायालयात याचिका
प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर केला. यात अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी उत्पादन सहाय्य म्हणून प्रतिवर्षी ६ हजार रुपये देण्याचा निर्णय मोदी सरकारने जाहीर केला. पीएम किसान योजनेंतर्गत ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून लवकरच पहिला हफ्ता लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती गोयल यांनी दिली.
दरम्यान शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आर्थिक सहाय्याबद्दल शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, शेतकऱ्यांसाठी सरकारकडून देण्यात आलेली वर्षाकाठी ६ हजाराची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन यांनी दिली. तसेच काही शेतकऱ्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची घोषणा होईल, अशी आपेक्षा होती. मात्र,सरकारने शेतकऱ्यांना गाजर दाखवले आहे. सरकारने अद्याप कर्जमाफी केली नाही. या ६ हजारांपेंक्षा श्रावनबाळ योजनेची रक्कम असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली. तर हे सरकार फक्त नोकरदार आणि उद्योजकांचे असल्याची टीका काही शेतकऱ्यांनी केली. या अर्थ संकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच असल्याचे चित्र असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.
हेही वाचा - BUDGET 2019 : ही तर नुसती झलक - पंतप्रधान नरेंद्र मोदी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES