• A
  • A
  • A
शेगाव तालुका काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा; अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

बुलडाणा - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शेगाव तालुका अध्यक्ष अशोक हिंगणे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यांच्या पदाबाबत मागील काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत मोठ्या स्तरावर गटबाजी दिसून येत आहे. या गटबाजीला कंटाळून आणि पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी त्यांनी राजीनामा दिला आहे.

फोटो सौजन्य - सोशल मीडिया


शेगाव तालुका हा जळगाव जामोद आणि खामगाव अशा दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विखुरलेला आहे. त्यामुळे, या दोन्ही मतदार संघाचे काँग्रेस नेते आपले पदाधिकारी विविध पदांवर नियुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असतात. अशातच माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी शेगाव तालुक्यातील विजय काटोले यांना शेगाव तालुकाध्यक्ष पदावर विराजमान केले. यासाठी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी तसे नियुक्तीपत्रही त्यांना दिले. मात्र, काही दिवसापूर्वी पक्षनेते गणेश पाटील यांनी जिल्हाध्यक्षांनी केलेली नियुक्ती ही बेकायदेशीर असून त्यांना नियुक्तीचे अधिकार नसल्याचे नमूद करीत कानउघडणी करणारे पत्र त्यांना दिले होते. शिवाय तालुकाध्यक्षपदी अशोकराव हिंगणे हेच कायम राहतील, असेही पत्रात नमूद केले होते.
हेही वाचा-बुलडाणा जिल्ह्याचे नाव "राजमाता जिजाऊ नगर" करा, शिवसंग्राम पक्षाची मागणी
सदर प्रकरण प्रसिद्धीमाध्यमांमध्ये चांगलेच रंगत असताना तालुकाध्यक्ष अशोकराव हिंगणे यांनी आज शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे आपला राजीनामा पाठविला आहे. सदर राजीनामा पत्रामध्ये आपण १९८५ सालापासून काँग्रेस पक्षात कार्यरत असून संघटन मजबूत करण्यासाठी विविध प्रयत्न केले आहेत. मात्र, तालुकाध्यक्ष पदावरून मागील काही दिवसांपासून पक्षांतर्गत गटबाजी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी आपण आपला तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहोत, असे नमूद केले आहे. या प्रकरणाने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा-बुलडाणा : हिवरा आश्रमात स्वामी विवेकानंद जयंती उत्सव संपन्न

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES