• A
  • A
  • A
बुलडाणा जिल्ह्याचे नाव "राजमाता जिजाऊ नगर" करा, शिवसंग्राम पक्षाची मागणी

बुलडाणा - जिल्ह्याचे नामकरण "राजमाता जिजाऊ नगर"करण्यात यावे, अशी मागणी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांनी केली. या मागणीसाठी शहरातील संगम चौक येथे आणि देऊळगांव राजा शहरातील बसस्थानक चौक येथे भव्य स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. यावेळी उत्स्फूर्तपणे नागरिकांनी आपली स्वाक्षरी करून या मागणीला पाठिंबा दिला.


बुलडाणा जिल्हा हा राजमाता जिजाऊंचा जिल्हा म्हणून संपूर्ण देशात प्रचलित आहे. या जिल्ह्यात मातृतीर्थ सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊ साहेबांचे जन्मस्थान आहे. याच मातेच्या कुशीतून छत्रपती शिवाजी महाराज यांनी जन्म घेतला व स्वराज्य स्थापन करून इतिहास घडविला. त्यामुळे आज महाराष्ट्राची नव्हे तर देशाची जगभरात ओळख निर्माण झाली आहे. अशी ओळख निर्माण करणाऱ्या तसेच शूरवीर छत्रपतींचा पूत्र घडविणाऱ्या महान आशा राजमाता जिजाऊ साहेबांचा इतिहास त्रिकाल अमर राहावा व पुढील येणाऱ्या पिढीस याचा सार्थ अभिमान वाटावा यासाठी बुलडाणा जिल्ह्याचे नामकरण "राजमाता जिजाऊ नगर" करण्यात यावे, अशी मागणी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांनी केली आहे.
हेही वाचा - अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीही नवीन नाही - रविकांत तुपकर
या मागणीला पाठींबा म्हणून आमदार विनायकराव मेटे यांच्या नेतृत्वात आज शुक्रवारी (१ फेब्रुवारी) जिल्हाभर स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. बुलडाण्याच्या स्थानिक संगम चौक येथे आणि देऊळगांव राजा शहरातील बस स्थानक चौक येथे भव्य स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. यावेळी उत्स्फूर्तपणे नागरिकांनी आपली स्वाक्षरी करून या नामकरणाच्या मागणीस पाठींबा दर्शविला. शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड, जिल्हासरचिटणीस निलेश ठिगळे, तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, जहीर पठाण, अजमत पठाण, संतोष हिवाळे, गजानन खार्डे, सुरेश निकाळजे, आयाज पठाण, अनिस खान यांनी नागरिकांना स्वाक्षरी अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन केले.
हेही वाचा - आम्हाला शिकायचंय, शिकवायला गुरुजी द्या; पंचायत समीतीत विद्यार्थ्यांनी भरवली शाळा

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES