• A
  • A
  • A
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीही नवीन नाही - रविकांत तुपकर

बुलढाणा - केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नवीन काहीही नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या जात आहेत. ५०० रुपये दर महिन्याला देण्याची घोषणा फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे, अशी टीका रविकांत तुपकर यांनी केली.


तुपकर पुढे म्हणाले, की मजुरांची रोजची मजुरी ४०० रुपये असते. सरकार महिन्याला ५०० रुपये देणार आहे. म्हणजे ही शेतकऱयांची सरळसरळ फसवणूक आहे. कांदा, दूध, भाजीपाला यांना हमीभावाच्या कक्षेत का आणले नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे. २२ पिके हमीभावाच्या कक्षेत होती. परंतु, त्यांना सरकारने हमीभाव दिलेला नाही. या संदर्भातला कडक कायदा सरकारने अर्थसंकल्पात करायला हवा होता. उत्पादन खर्च्याबाबतीत सरकारने मेख मारली आहे. सरकारने उत्पादन खर्च कमी दाखवलेला आहे. हा उत्पादन खर्च कृषी मूल्य आयोगाच्या किमान एका तरी सदस्याने सिद्ध करुन दाखवायला पाहिजे, असेही तुपकर म्हणाले.

मत्स्यव्यवसाय विभाग आधीच होता. परंतु, सरकारने आता मत्स्यव्यवसाय विभागाची नवीन घोषणा केली आहे. जुनी दारू आणि नवीन बाटली, असा हा प्रकार आहे. सरकारने ११ हजार कोटी रुपयाचे कर्जवाटप केल्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात ३७ टक्केच कर्जवाटप झाले आहे. सादर केलेल्या अर्थसंकल्पात सिंचनासाठी तरतूद केलेली नाही. जागतिक बाजारातले भाव पडले, तर भाव स्थिर करण्यासाठी सरकारने निधी दिला पाहिजे. सरकारने निधीची तरतूद केली पाहिजे. तरुण शेतीमधून बाहेर पडत आहेत. त्यांच्या शेतीकौशल्यासाठी काहीही केले नसल्याचे तुपकर यांनी नमूद केले.
दुष्काळनिवारणासाठी सरकारने काहीही केले नाही. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्या आहेत, असाही आरोप तुपकर यांनी केला.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES