• A
  • A
  • A
आम्हाला शिकायचंय, शिकवायला गुरुजी द्या; पंचायत समीतीत विद्यार्थ्यांनी भरवली शाळा

बुलडाणा - आम्हाला शिकायचंय, शिकवण्यासाठी गुरुजी द्या, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी चक्क पंचायत समिती कार्यालयामध्येच शाळा भरवली. अकोली बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी संग्रामपूर पंचायत समिती कार्यालयामधील गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ही अनोखी शाळा भरवली.


जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील अकोली बु.येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेला पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असून एकूण पटसंख्या ८२ आहे. परंतु, शाळेत २ शिक्षकच कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याकरिता बुधवारी ३० जानेवारी रोजी येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये विद्यार्थी-विद्यार्थींनीसह पालकांनी शाळा भरवली. याबाबत ३ जानेवारी रोजी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते.

वाचा- विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिकचा अपघात, १७ विद्यार्थी जखमी
मागील ५ ते ६ महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षकांची आवश्यकता आहे. तरी या जि.प.माध्यमिक शाळेला शिक्षक देण्यात यावे. शाळेला शिक्षक न दिल्याने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी ३० जानेवारीला संग्रामपूर पंचायत समिती कार्यालयात सकाळी ११ वाजता पासून अकोली बु. येथील पहिली ते चौथीच्या वर्गांतील विद्यार्थींनी-विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळा भरवून लवकरात लवकर शिक्षक देण्यात यावे या मागणीकरीता आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांनी पालकांना समजावून सांगत तात्पुरत्या स्वरुपात एका शिक्षकाची व्यवस्था केली. त्यानंतर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

वाचा- खामगावच्या हिंदूस्तान युनिलीव्हर कंपनीमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान, गुन्हा दाखल


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES