• A
  • A
  • A
विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिकचा अपघात, १७ विद्यार्थी जखमी

बुलडाणा - खामगाव शेलोडी रोडवरील ड्रीमलँड सिटी शाळेचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये १७ विद्यार्थी जखमी झाले आहेत. यामध्ये ८ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. तर ९ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यातील एका विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत


हेही वाचा-खामगावच्या हिंदूस्तान युनिलीव्हर कंपनीमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान, गुन्हा दाखल
जिल्ह्यातील खामगाव शेलोडी रोडवरील ड्रीमलँड सिटीनजीक टाटा मॅजिक (MH-२१-व्ही-३५८०) ही स्कुल बस जागृती विद्या मंदिर येथे विद्यार्थी शाळेत घेऊन जात होती. यावेळी गाडीचे स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व अपघात घडला.

जखमी विद्यार्थ्यांना नागरिकांनी त्वरित सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने माजी आमदार दिलीप सानंदा आदिनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन विचारपूस केली.

हेही वाचा-शेगावात राज्य टंकलेखन-लघू टंकलेखन संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES