• A
  • A
  • A
खामगावच्या हिंदूस्तान युनिलीव्हर कंपनीमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान, गुन्हा दाखल

बुलडाणा - जिल्ह्यातील खामगाव शहरातील औद्योगिक वसाहतीतील हिंदूस्तान युनिलिव्हर कंपनी आहे. येथे प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


सूर्यास्तनंतर राष्ट्रधवज न उतरविता थेट दुसऱ्या दिवशी कंपनीने राष्ट्रध्वज उतरवल्याचे समोर आले. यानंतर शिवसेनेच्या उद्योग शाखेचे तालुकाप्रमुख तुकाराम देवरे यांनी कंपनीच्या सुरक्षारक्षकाविरुद्ध राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सोमवारी २८ जानेवारीला रात्री तक्रार केली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -मद्यधुंद पोलिसांचा प्रताप; महिलेस काठीने जबर मारहाण
खामगाव येथील औद्योगिक वसाहतीतील हिंदूस्तान युनिलिव्हर कंपनीमध्ये २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी ७ वाजता झेंडावंदन करण्यात आले. दरम्यान शहरातील अरजन खिमजी नॅशनल हायस्कूलमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांत कंपनीतील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नाचगाण्यासह अनेक लावण्यांवर रात्री उशिरापर्यंत ठेका धरला. मात्र सूर्यास्ताअगोदर झेंडा उतरविण्याचे कंपनीमधील प्रमूख आणि ज्याला राष्ट्रध्वज उतरविण्याची जबाबदारी दिली होती त्यानेही राष्ट्रध्वज उतरवलाच नाही. मात्र, हे लक्षात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता झेंडा उतरून राष्ट्रध्वजाचा अवमान केला. शिवसेनेच्या उद्योग शाखेचे तालुकाप्रमुख तुकाराम देवरे यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हिंदूस्तान युनिलीव्हर कंपनीमध्ये जाऊन याचा जाब विचारला. यानंतर खामगाव अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली.

हेही वाचा -शेगावात राज्य टंकलेखन-लघू टंकलेखन संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन
पोलीस तपासानंतर हिंदूस्तान युनिलीव्हर कंपनीमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचे आढळून आल्याने सुरक्षारक्षक शिवचरण जयराम सरदार राहणार शिक्षक कॉलनी खामगाव, याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात राष्ट्रप्रतिष्ठा अवमान प्रतिबंध, अधिनीयमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यास्तापूर्वी झेंडा उतरविण्याची जबाबदारी ज्या कंपनी प्रमुखाची होती त्याला मात्र कारवाई पासून दूर ठेवण्यात आल्याची परिसरत चर्चा आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES