• A
  • A
  • A
विदेशातून पार्सल आल्याचे सांगून लोकांची फसवणूक, तरुणीसह दोघांना अटक

भंडारा - विदेशातून आलेला पार्सल सोडवण्यासाठी बँकेत पैसे जमा करा अन्यथा तुमच्यावर पोलीस कारवाई करू अशी धमकी देत लोकांना लुबाडणाऱ्या गडचिरोलीच्या तरुणीसह तिच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या गोरखधंद्याचा मास्टरमाइंड असलेला या तरुणीचा प्रियकर नायजेरियन युवक आणि २ साथीदार अजूनही फरार असून भंडारा पोलीस त्यांचा शोध घेत आहे.


भंडारा तालुक्यातील गणेशपूर येथील रहवासी असलेल्या उषा विनोद कनोजिया या महिलेला मे २०१८ मध्ये फोन आला. या फोनवरून या महिलेला सांगण्यात आले की आम्ही विदेशातून पाठवलेला पार्सल तुम्ही उचललेला नाही. आम्ही पुन्हा तो पार्सल पाठवणार आहोत. यावेळी हा पार्सल तुम्ही उचलला नाही तर तुमच्यावर आम्ही पोलीस कारवाई करू अशी धमकी देण्यात आली. तसेच हा पार्सल उचलण्यासाठी तुम्ही बँकेमध्ये ६० हजार रुपये भरा असे सांगून एक अकाउंट नंबर दिला. पोलिसांच्या भीतीपोटी या महिलेने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या डहाणू शाखेत ६० हजार रुपये आरटीजीएस केले. त्यानंतर पुन्हा तिने २५ हजार याच खात्यात पाठविले होते. ८५ हजार पाठवल्यानंतरही ६ महिन्यात एकही पार्सल घरी न आल्याने तिला फसवणू झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
हेही वाचा - भिवंडी महापालिकेच्या तरण तलावात १९ वर्षीय युवकाचा बुडून अंत
भंडारा जिल्ह्याच्या शेजारी असलेला गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील सुरुची बाबुराव आलाम या २८ वर्षीय मुलीने तिच्या प्रियकर डेही उर्फ एलायजा लाजरे या नायजेरियन मुलासह मिळून दिल्लीतून हा फसवणुकीचा धंदा सुरू केला होता. यासाठी सुरुचीने आपले २ मित्र पालघर जिल्ह्यातील जितेश डोंगरकर २८ वर्ष आणि नितीन हाडळ वय ३२ वर्षे यांना मला दिल्ली येथे नौकरी लागली आहे. त्यासाठी मुंबईत बँकेत खाते उघडायचे असल्याचे सांगितले. त्यांनी मैत्रिणीवर विश्वास ठेवून डहाणू येथे खाते उघडून त्याची पासबुक आणि एटीएम सुरुचीला पाठविले. नंतर सुरुची आणि डेही यांनी स्वतःच्या घरातूनच कॉल सेंटर सुरू करून हा रॅकेट सुरू केला. लोकांना विदेशातून पार्सल पाठवत असल्याचे सांगून त्यांच्याकडून अशाच पद्धतीने पैसे उघडले. पोलिसांनी सर्वप्रथम डहाणू येथून जितेश डोंगरकर आणि नितीन हाडळ यांना अटक केली. सुरुचीच्या सांगण्यावरूनच बँक खाते उघडले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून भंडारा पोलिसांनी सुरुची दिल्लीवरून नागपूरला येत असताना तिला एअरपोर्टवरच अटक केली. सुरुचीला अटक झाल्याची माहिती होताच डेही उर्फ एलायजा लाजारे हा दिल्लीतून आपल्या राहत्या घरून सर्व सामान घेऊन पसार झाला.
हेही वाचा - सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
सुरुची आणि डेही यांच्यासह सुरुचीची बहिण आणि तिचा आतेभाऊ दोघेही या सर्व घोटाळ्यात सामील होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेशच्या खात्यात १८ ते २० लाखांचे ट्रांजेक्शन झाले होते. हे पैसे सुरुचीची बहिण आणि आते भाऊ यांच्या अकाउंटला ट्रान्सफर झाले होते. पोलिसांनी सध्या सुरुची आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली असून नायजेरियन युवक डेही आणि सुरुचीची बहिण आणि आते भाऊ यांचा शोध घेणे सुरू आहे.
सध्या अशा पद्धतीने फसवणुक झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे लोकांनी सावध राहणे आणि अशा पद्धतीचे फोन आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES