• A
  • A
  • A
वाळूच्या ढिगाऱ्यात आढळला मृतदेह, अनैतिक संबंधातून पत्नीनेच केली पतीची हत्या

भंडारा - मोहाडी तालुक्यात राहणाऱ्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. ही हत्या अनैतिक संबंधातून त्याच्या पत्नीनेच केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.


नेरी गावातील सुर नदीत ६ फेब्रुवारी रोजी नरेश लांजेवार या चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह वाळूच्या ढिगार्‍यात आढळला होता. मृतदेह मिळाल्यानंतर २४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपीचा शोध लावला. या प्रकरणात मृत व्यक्तीची पत्नी, तिचा प्रियकर आणि हत्यारे, अशा ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
नरेश याचा मृतदेह नदीच्या मधोमध वाळूच्या ढिगार्‍यात मिळाल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी हत्येच्या दिशेने तपास सुरू केला. तपासात असे लक्षात आले की मृत नरेंद्र लांजेवार यांची पत्नी आरोपी पुष्पा लांजेवार हीचे रोहना गावातील ३६ वर्षीय अनिल सुखराम आगाशे आणि नेरी गावातील ४० वर्षीय कंठीराम हजारे यांच्याशी विवाहबाह्य संबंध होते. या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या नरेंद्रची हत्या करण्याचा कट रचला. यासाठी नागपूर तालुक्यातील कन्हान येथे राहणाऱ्या नंदू देवरावजी मंडपे (वय ३६) याला १० हजार रुपये देण्यात आले.
हेही वाचा - भंडाऱ्यात वाळूच्या ढिगार्‍याखाली पुन्हा सापडला एक मृतदेह
घटनेच्या दिवशी नंदू मंडपे आणि कंठीराम हजारे यांनी नरेश याला वरठीवरून दुचाकीने नेरी गावात आणले. दारूमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून त्याला दारू पाजली. नरेश बेशुद्ध झाल्यावर त्याच्या डोक्यावर काठीने वार करून त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह नदीमधील वाळूच्या ढिगाऱ्याखाली पुरण्यात आला.
नरेश हा १६ जानेवारी २०१९ पासून गायब होता. मात्र त्याच्या पत्नीने २८ जानेवारी २०१९ ला हरवल्याची तक्रार मोहाडी पोलीस स्थानकात दिली. एवढ्या उशिरा तक्रार दिल्याने सर्वात पहिला संशय त्याच्या पत्नीवर आला, तपासात ते सिद्धही झाले. पोलिसांनी आरोपीची पत्नी आणि तिच्या ३ साथीदारांना अटक केली असून त्यांच्यावर वरठी पोलीस स्टेशन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा - लग्नाच्या ८ दिवस अगोदरच तरुणीवर काळाचा घाला; केळवण करून परतताना अपघात
गेल्या एका महिन्यात भंडारा जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात ४ हत्याकांड झाले. या चारही हत्याकांडात मुख्य आरोपी मृतांची पत्नीच निघाली. तर पतीची हत्या करून वाळूच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह पुरण्याची ही दुसरी घटना आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES