भंडाऱ्यात वाळू तस्करांवर कारवाई, ३०० ब्रास वाळू जप्त
भंडारा - अवैध वाळू उत्खनन होत असलेल्या पाचगावच्या घाटावर मोहाडी तहसील विभागाने कारवाई करत ३०० ब्रास वाळू जप्त केली. ही कारवाई पत्रकारांच्या दबावानंतर करण्यात आली. वाळूचे अवैध उत्खनन हे महसूल विभागाच्या अधिकाऱ्याच्या देखरेखीत होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा - जळगावात वाळूमाफियांची दहशत; जिल्हाधिकारी कार्यालयातून वाळूचे ७... भंडारा जिल्ह्यातील वाळूला संपूर्ण विदर्भात मोठी मागणी आहे. वाळू घाटाचे लिलाव न झाल्यामुळे वाळू तस्करांनी अवैध वाळू तस्करीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. ही अवैध वाळू तस्करी थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तहसीलमध्ये पथक तयार केलेले आहेत. यात नायब तहसीलदार, कर्मचारी आणि २ पोलीस कर्मचारी अशी ७ लोकांची एक पथक अशा ७ ते ८ पथक प्रत्येक तहसीलमध्ये तयार केली गेली आहे, मात्र महसूल आणि पोलीस यांच्या या संयुक्त पथक फक्त कागदोपत्रीच आहेत. एवढेच नाही तर जीपीफ आणि ड्रोनचाही उपयोग केला जात असल्याचे जिल्हाधिकारी प्रत्येक वेळेस सांगतात, खरे तर या उपाय-योजना नंतरही जिल्ह्यातील, भंडारा, तुमसर, मोहाडी, पवनी, लाखांदूर, साकोली या प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा आणि वाहतूक होत आहे, मात्र कार्यवाही बद्दल विचारल्यास जिल्हाधिकारी जिल्ह्यात अवैध उत्खनन बंद असल्याचे सांगतात. मोहाडी तालुक्यातील पाचगाव येथील घाटावर अशीच अवैध उत्खनन आणि साठा करून नंतर ट्रॅकद्वारे त्याची वाहतूक करण्याचे प्रकार वर्षभरापासून सुरू होते. गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि मोहाडी तहसीलदाराना याची निवेदनद्वारे माहिती दिली, मात्र कोणीही हे अवैध उत्खनन थांबविले नाही, ही बाब पत्रकारांना माहिती होताच त्यांनी घाटावर जाऊन पाहणी केली. तेव्हा नदीतून ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा करून डम्पिंग केले जात होते. वाळू जेसीबीच्या साहाय्याने ट्रकमध्ये भरून वाहतूक केली जात असे, हे दृश्य कॅमेरामध्ये कैद करण्यास सुरू होताच ट्रॅक्टर चालक, ट्रक चालक आणि जेसीबी चालकांनी मिळेल त्या दिशेने पळ काढला. हेही वाचा - गोंदियातील नगरसेवकाने कापला वाळू घाटाचा केक, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी... पत्रकार घाटावर पोहोचल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या पथकाला मिळाली. पत्रकारांनी त्यांना फोन करून घाटावर येऊन कार्यवाही करण्याची विनंती केली, मात्र आम्ही नंतर येऊ असे सांगून टाळत राहिले. मात्र पत्रकार आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने नाईलाजास्तव ३०० ब्रास वाळू जप्तीची कार्यवाही करावी लागली. पत्रकारांच्या सतर्कतेमुळे या महसूल कर्मचाऱ्यांना ही कारवाई करावी लागली. जप्त केलेली ही वाळू लिलावाद्वारे विकली जाईल आणि हा लिलाव फक्त एक वाळू माफिया घेईल आणि ३०० ब्रास ऐवजी कितीतरी अतिरिक्त वाळू उत्खनन करेल. रेती उत्खनन हे सर्वत्र सुरू आहे आणि सर्वांना दिसतही आहे फक्त दिसत नाही ते महसूल विभाग आणि पोलीस विभागांना. त्यामुळेच शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल अधिकारी बुडवित आहेत. जिल्हाधिकारी कितीही म्हणत असले तरी जिल्ह्यात अवैध उत्खनन सुरू आहे. हे या जप्तीनंतर तरी जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेली पथक शासनाला महसूल मिळवून देते की, वाळू माफियासाठी काम करते याकडे जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा - भंडाऱ्यात वाळूच्या ढिगार्याखाली पुन्हा सापडला एक मृतदेह