• A
  • A
  • A
परवानगी नसताना बोटिंग सुरुच, तहसीलदारांकडून जप्तीचे आदेश

भंडारा - जिल्ह्यातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा तलाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदपूरच्या तलावात अवैध बोटिंग सुरू आहे. सुरक्षेचे नियम पायदळी तुडवून बोटिंग सुरू असल्याने लोकांचे जीव धोक्यात आहे. तक्रारीनंतरही बोटिंग बंद होत नसल्याने तहसीलदारांनी जप्तीचे आदेश दिले आहे.

तलावावरील छायाचित्र


चांदपूर गाव हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. हनुमानाच्या मंदिरात लाखो भाविक दरवर्षी येत असतात आणि हेच भाविक मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर निसर्गाने नटलेल्या तलावाकडे जातात. हा तलाव महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या नियंत्रणात आहे. दहा वर्ष पहिले येथे पर्यटकासाठी कंत्राटी पद्धतीवर हॉटेल्स आणि बोटिंग सुरू करण्यात आली होती. त्या काळात बोटिंग करताना कंत्राटदार सर्व नियमांचे पालन करायचा. मात्र कंत्राट संपल्यानंतर दुसऱ्या लोकांनी अवैधरित्या बोटिंग आणि मासेमारी सुरू केली.
हेही वाचा - रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात, गृहकर्ज होऊ शकते स्वस्त
प्रतिव्यक्ती 30 रुपये घेऊन बोटिंग करविली जाते. मात्र हे करताना लाईफ जाकेट घातले जात नाही आणि सुरक्षेच्या इतर गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून महिलांना आणि लहान मुलांना बोटिंग करविली जाते. हा तलाव विस्तीर्ण आणि खोल आहे. तलावाचा काही भाग उंच आणि खडकांचा आहे. यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या अवैध बोटिंगविषयी वारंवार जलसंपदा विभागाकडे तक्रार करूनही अधिकारी तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या जलसंपदा अधिकाऱ्यांचे या अवैध बोटीमध्ये काही साटेलोटे तर नाही ना असा प्रश्न गावकरी करीत आहेत. याविषयी तुमसर तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांना तक्रार प्राप्त होताच त्यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत जलसंपदा विभागाला ती बोट जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. जर तरीही बोट सुरू राहिली तर पोलिसांच्या मदतीने आम्ही स्वतः ही बोट जप्त करू असे तहसीलदार यांनी सांगितले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES