• A
  • A
  • A
भंडाऱ्यात वाळूच्या ढिगार्‍याखाली पुन्हा सापडला एक मृतदेह

भंडारा - वरठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेरी गावातील सुर नदीपात्रात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नदी पात्राच्या मधोमध वाळूच्या ढिगाऱ्यात मृतदेह आढळल्याने घातपात असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. भंडारा जिल्ह्यात एका महिन्याच्या कालावधीत अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. वरठी पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे.


हेही वाचा -लग्नाच्या ८ दिवस अगोदरच तरुणीवर काळाचा घाला; केळवण करून परतताना अपघात
वरठीपासून ३ किलेमीटर अंतरावर असलेल्या नेरी गावा जवळून सूर नदी वाहते. या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन अवैधरित्या करण्यात येते. बुधवारीही नदीपात्रातून वाळूचे उत्खनन करत असताना नदीच्या मध्यभागातून वाळूच्या ढिगाऱ्यात मानवी शरीर अवयव असलेले भाग निर्दशनास आले.

सरपंच आनंद मालेवार यांनी तात्काळ वरती पोलिसांना याची माहिती दिली. वरठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एसबी ताजने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत परिसरात मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमा झाली होती. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जागा पोखरून काढण्यात आली. यात जवळपास ५० वर्षे वय असलेल्या ५ फूट उंचीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने त्याची ओळख पटू शकली नव्हती.
हेही वाचा - हिंदुस्तान कंपोझिट कंपनीच्या कामगारांचे मृतदेह घेवून आंदोलन
जिल्ह्यामध्ये कोणी हरवल्याची तक्रार दिली आहे का याचा शोध पोलिसांनी घेतला. मोहाडी पोलीस स्टेशनअंतर्गत १६ जानेवारी २०१९ पासून मोहाडी येथील ४८ वर्षीय नरेश लांजेवार हरवले असल्याचे कळले. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी यांच्या कुटुंबीयांना बोलविण्यात आले, मृताच्या अंगावर असलेले कपडे व इतर साहित्यावरून मृत हा नरेश लांजेवार असल्याचे नातेवाईक यांनी सांगितले. नरेश यांच्या खिशात २० रुपयांच्या नोटा, रेल्वेचे तिकीट आणि काही कागदपत्रे सापडले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरता पाठवले असून नरेश लांजेवार हा या घाटापर्यंत स्वतः होता की त्याची हत्या करून येथे आणून वाळूच्या ढिगार्‍यात त्याला गाडले गेले होते, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. यापुर्वी ६ जानेवारीला अशाच पद्धतीने ४८ वर्षीय दिलीपसिंग चव्हाण याचा मृतदेह वाळूचा ढिगाऱ्याखाली आढळून आला होता.

हेही वाचा -'६ हजार नको, स्वामीनाथन आयोगानुसार हमीभाव, सिंचनाची व्यवस्था द्या'


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES